घरमुंबईपत्रकार हर्मन गोम्सवरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

पत्रकार हर्मन गोम्सवरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

Subscribe

‘टाईम्स नाऊ’ या राष्ट्रीय इंग्रजी वृत्त वाहिनीचे पत्रकार हर्मन गोम्स यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून गोम्स यांच्या डोळ्याला आणि चेहर्‍याला गंभीर इजा झालेली आहे.

या प्रकरणी गोम्स यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात जावून आपली तक्रार नोंदवली. पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत असून मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, टिव्हीजेए, मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ, अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ, बॉम्बे न्युज फोटोग्राफर असोसिएशन इत्यादी पत्रकार संघटनांनी याचा निषेध नोंदवला. पत्रकारांवर होणार्‍या अशा भ्याड हल्ल्याबद्दल प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अनेक खाजगी संस्थांनीसुद्धा याबद्दल निषेध आंदोलने केली असून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

टाइम्स नाऊमध्ये आलेल्या एखाद्या बातमीने दुखावलेल्या व्यक्तीकडून हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. माझ्या कोणत्या स्टोरीमुळे माझ्यावर हा हल्ला झाला माहिती नाही पण आतापर्यंत पूर्णखात्री करूनच स्टोरीज दिल्याचे हर्मन गोम्स यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -