घरमुंबईचिंचपोकळीत पुनश्च मातीवर रंगणार कबड्डीचा थरार

चिंचपोकळीत पुनश्च मातीवर रंगणार कबड्डीचा थरार

Subscribe

चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळाने 'चिंतामणी चषक' राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये ९ जिल्ह्यातील १८ संघांनी सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळाने ‘चिंतामणी चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चिंतामणी चषक’ राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा २०१९ ही स्पर्धा ०९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधी दरम्यान सदगुरू भालचंद्र महाराज क्रिडांगण , चिंचपोकळी येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत ९ जिल्ह्यातील १८ संघांचा सहभाग

कबड्डी स्पर्धेत एकूण ९ जिल्ह्यातील १८ संघ सहभागी होणार आहेत. १८ संघाचे ६ गटात विभाजन करून प्रथम दोन दिवस साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर मातीच्या २ मैदानावर सामने खेळवण्यात येणार असून सर्व सामने सायंकाळी ५ ते १० च्या दरम्यान होणार आहे.

- Advertisement -

स्पर्धेत सहभागी संघ

या स्पर्धेसाठी राज्यातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सांगली, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. मुंबई शहर मधील नामवंत आठ संघ, मुंबई उपनगर आणि ठाण्याचे प्रत्येकी २-२ संघ तर इतर जिल्ह्यातील प्रत्येकी १-१ संघ असणार आहेत. दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब, एस एस जी फाऊंडेशन, विकास क्रीडा मंडळ, जय दत्तगुरू कबड्डी संघ, विजय बजरंग व्यायाम शाळा, सिद्धिप्रभा फाऊंडेशन, गोल्फादेवी संघ आणि बंड्या मारुती सेवा मंडळ हे मुंबई शहर चे आठ संघ तर स्फूर्ती क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगरचे, ग्रफिन जिमखाना, ठाणे, ओम कल्याण संघ ठाणे जिल्हा श्री राम क्रीडा मंडळ, पालघर, जय बजरंग क्रीडा मंडळ, रायगड, श्री साई स्पोर्ट्स क्लब, नाशिक, सम्राट क्रीडा मंडळ, सांगली, वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी, उत्कर्ष क्रीडा मंडळ, पुणे या संघाचा स्पर्धेत समावेश आहे.


वाचा – छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक : मुंबई शहरला ‘दुहेरी’ यश

- Advertisement -

वाचा – छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई उपनगरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -