घरमुंबईजगभरातील पहिल्या १० घाणेरड्या स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला आणि ठाण्याचा समावेश

जगभरातील पहिल्या १० घाणेरड्या स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला आणि ठाण्याचा समावेश

Subscribe

कल्याण, कुर्ला, ठाणे; जगातील टॉप १० अस्वच्छ स्टेशन्सच्या यादीत

 

कल्याण, कुर्ला, ठाणे; जगातील टॉप १० अस्वच्छ स्टेशन्सच्या यादीत

- Advertisement -

कल्याण, कुर्ला आणि ठाणे या स्थानकांचा समावेश जगभरातील सर्वात घाणेरड्या दहा स्थानकांमध्ये करण्यात आला आहे. ११ ते १७ मे दरम्यान भारतीय रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातल्या सर्वात घाणेरड्या स्थानकांमध्ये कानपूरचा पहिला क्रमांक लागला आहे. तर एकाच शहरातील तीन स्थानकांची नावं असलेलं मुंबई हे एकमेव शहर असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. मागील आठवड्यातच मुंबई ही स्वच्छ राजधानी असल्याचे जाहीर झाले होते. मात्र आता याला भेद देणारी बातमी समोर येतेय.

५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी स्वच्छतेबाबत असमाधानी

- Advertisement -

कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे यांचा अनुक्रमे ३ रा, ५ वा आणि ८वा क्रमांक जगभरातील सर्वात घाणेरड्या स्थानकांमध्ये लागतो. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानकावरून साधारणतः २.१५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. त्यापैकी ५८.७४ टक्के लोकांनी कल्याण स्टेशनवरील स्वच्छतेसंदर्भात ते समाधानी नसल्याचे सांगितले आहे. लांब पल्ल्याच्या ९० टक्के गाड्या आणि ५७२ स्थानिक लोकल कल्याण स्थानकामध्ये येतात. तर अनुक्रमे लोकमान्य टिळक टर्मिनसच्या स्वच्छतेबाबत ५५.८९ टक्के लोक आणि ठाणे स्टेशनच्या बाबतीत ५५.७२ टक्के लोक असमाधानी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाचा पुढाकार

याविषयी मध्य रेल्वेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्वच्छता राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी लवकरच पावलं उचलण्यात येण्याचे आश्वासन दिले आहे. मागच्याच महिन्यात एलटीटी स्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी कंत्राट करण्यात आले असून कुर्ला आणि ठाणे स्थानकांसंदर्भातील कंत्राटाचे काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. एलटीटीवरून रोज ५० हजार प्रवासी प्रवास करतात, मात्र पाण्याच्या कमरतेमुळे स्वच्छता राखली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक विशाल अगरवाल यांनी सर्व स्थानकांवरील सोयीसुविधा चांगले करण्याची प्रक्रिया सध्या चालू असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -