घरमहाराष्ट्रप्राण्यांच्या बचावासाठी प्राणी मित्र अॅप लाँच

प्राण्यांच्या बचावासाठी प्राणी मित्र अॅप लाँच

Subscribe

वन विभागाच्या ठाणे प्रादेशिक विभागाने प्राण्यांना वाचविण्यासाठी खास मोबाईल अॅप बनविले आहे. ‘प्राणी मित्र’ नावाचे हे अॅप असणार आहे. अॅपवर प्राण्यांबद्दल सर्व माहिती उपलब्ध असेल. देशभरातील वनविभागांमध्ये आतापर्यंत अशाप्रकारे कुठल्याही अॅपचा वापर करण्यात आला नाही. ही संकल्पना सुरु करणारा ठाणे प्रादेशिक वनविभाग हा पहिला असणार आहे.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता या दिवसाचे औचित्य साधून या अॅपचे उदघाटन करण्यात येणार आहे. पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये हे अॅप पूर्णतः कार्यान्वित होईल. तसेच हा अॅप फक्त अधिकृत वन्यजीव सुरक्षिततांसाठीच उपलब्ध असेल. कुठल्याही अॅप स्टोअर दुकानामध्ये हा अॅप उपलब्ध नसणार, असे ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपसंचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांनी सांगितले.

- Advertisement -

एखाद्या प्राण्याला वाचवल्यानंतर वन विभागाकडे सर्व माहिती पुरवावी लागते. हा डेटा आतापर्यंत ईमेलद्वारे पाठविला जायचा. आता मात्र या अॅपमुळे जनावरांना तसेच प्राण्यांना वाचवल्याची माहिती सहज देता येऊ शकते. यामुळे आता वाचविलेल्या प्राण्यांची सर्व माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होईल.

ज्या संस्था किंवा व्यक्ती या अॅपसाठी अर्ज करु इच्छितात, त्यांना एक अर्ज सादर करावा लागेल. त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे का? किंवा प्राणी बचाव कार्यांसाठी ते योग्य असणार की नाही हे तपासले जाणार आहे. तपासणी झाल्यानंतर त्यांच्या क्षमतेची खात्री पटल्यावर त्यांना अॅप वापरण्यासाठी एक वेगळा आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल.

- Advertisement -

वन विभागाकडे जवळपास शंभर अर्ज या अॅपसाठी आले आहेत. सुप्रसिद्ध वन्यजीव अभियंता सुनीश सुब्रमण्यम म्हणाले की, “मी देशाच्या इतर कोणत्याही वन विभागाबद्दल ऐकले नाही ज्यात असे एक अॅप्लिकेशन आहे.” या अॅपमुळे अधिकाऱ्यांना, बचाव केलेल्या जनावरांचे स्थान कळू शकेल कारण बचावकर्त्यांना भौगोलिकरित्या प्राण्यांना टॅग करणे आवश्यक असते. बचाव केल्यानंतर प्राण्यांचे स्थान आणि इतर तपशीलासह माहीती अॅपवर अपलोड केले जातील. त्यांच्या सुटकेची छायाचित्रे अपलोड केल्या नंतरच बचावकार्य पूर्ण झाले असे गृहित धरण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -