घरमुंबईबॅगेतील मृतदेह प्रकरण : जातीबाहेर होते प्रेम; बापानेच केली मुलीची निर्घृण हत्या

बॅगेतील मृतदेह प्रकरण : जातीबाहेर होते प्रेम; बापानेच केली मुलीची निर्घृण हत्या

Subscribe

पोटच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्यावर झालेल्या वादात मुलीची हत्या पित्यानेच केल्याचा प्रकार कल्याणात उघड झाला आहे. मुलीची हत्या केल्यावर पित्याने तिचे डोके धडावेगळे केले आणि मृतदेह एका बॅगेत भरून ही बॅग घेऊन मारेकरी पिता कल्याणातील एका रिक्षात बसला. बॅगेतून दुर्गंधी आल्याने रिक्षाचालकाने हटकले असता बॅग तिथेच टाकून खुनी पिता पळून गेला, हा प्रकार रविवारी उघड झाला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास करून ३० तासांत मुख्य आरोपी पित्याला गजाआड केले.कल्याणचे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने या भीषण गुन्ह्याचा छडा लावला.

आठ डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात इसम कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर भिवंडीकडे जाण्यासाठी रिक्षात बसला. त्याच्या हातात एक प्रवासी बॅग होती. बॅगेतून दुर्गंधी आल्याने या प्रवाशाला रिक्षा चालकाने हटकले. त्यामुळे प्रवासी रिक्षातच बॅग सोडून पळून गेला. या बॅगमध्ये अज्ञात तरुणीचा कमरेखालचा भाग आढळला.

- Advertisement -

या घटनेची स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली. महात्मा फुले चौक ठाणे पोलिसांनी मृतदेहाचे कापलेले अवयव ताब्यात घेतले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि माहिती देणार्‍यांना कामाला लावले. तपासात सीसीटीव्हीतील आरोपी हा टिटवाळा येथे राहणारा असून त्याचे नाव अरविंद रमेशचंद्र तिवारी (47 राटिटवाळा, ठाणे) येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. तो पवनहंस लॉजिस्टिक मालाड मुंबई या ट्रान्सपोर्टमधे कामाला होता. गुन्हे शाखा पथकाने तिवारीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेली माहिती भीषण आणि थरकाप उडवणारी होती. मृत्यू झालेली 22 वर्षाची तरुणीच्या प्रेमप्रकरणाला आरोपी अरविंद तिवारी याचा विरोध होता. त्यामुळे त्याने मुलीची हत्या केली.

अरविंद तिवारी याला चार मुली होत्या. मृतक प्रिन्सी (22) ही मोठी मुलगी होती. ती खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे प्रेमप्रकरण सुरू होते. याची माहिती आरोपी अरविंद तिवारीला होती. त्याने मुलीला वारंवार याबाबत दरडावले होते. मुलगी प्रिन्सीला आवडणारा मुलगा हा आपल्या जातीतला नाही, म्हणत त्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. मात्र मुलगी ऐकत नसल्याने त्याने तिची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याने मृतदेहाचे दोन तुकडे केले. एक तुकडा कल्याण मध्येच टाकल्याची माहिती त्याने दिली. तर दुसरा तुकडा रिक्षातून नेताना हा भीषण प्रकार उघड झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -