घरमुंबईकोचर, धूत यांना कारागृहात मिळणार खुर्ची, बेड, गाद्या

कोचर, धूत यांना कारागृहात मिळणार खुर्ची, बेड, गाद्या

Subscribe

चंदा व दीपक कोचर यांचे वय ६१ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना कारागृहात जमीनीवर झोपता येणार नाही. थंडी सुरु झाली आहे. जमीनीवर झोपल्याने त्यांच्या आरोग्याला त्रास होऊ शकताे. त्यामुळे त्यांना झोपण्यासाठी बेड व गाद्या द्याव्यात. खुर्ची, औषधे व घरचे जेवण देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचर यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आली होती. त्याचवेळी धूत यांनीही अशीच मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला. न्यायालयाने कोचर व धूत यांचा अर्ज मंजूर केला.

मुंबईः आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडिओकाॅन समुहाचे मालक वेणुगोपाल धूत यांना कारागृहात खुर्ची, बेड, गाद्या व घरचे जेवण देण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली आहे.

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयने या तिघांना अटक केली. हे तिघेही सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. कारागृहात घरचे जेवण व नियमित औषधे घेण्यास परवानी द्यावी तसेत बेड व गाद्या द्याव्यात, अशी मागणी या तिघांनी न्यायालयात केली होती.

- Advertisement -

चंदा व दीपक कोचर यांचे वय ६१ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना कारागृहात जमीनीवर झोपता येणार नाही. थंडी सुरु झाली आहे. जमीनीवर झोपल्याने त्यांच्या आरोग्याला त्रास होऊ शकताे. त्यामुळे त्यांना झोपण्यासाठी बेड व गाद्या द्याव्यात. खुर्ची, औषधे व घरचे जेवण देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचर यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आली होती. त्याचवेळी धूत यांनीही अशीच मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला. न्यायालयाने कोचर व धूत यांचा अर्ज मंजूर केला.

बेड, गाद्या, खुर्ची व औषधे घेण्यासाठी चंदा कोचर कुटुंबियांना भेटू शकतात. तसेच दीपक कोचर हे त्यांच्या वकीलांना भेटू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान कोचर यांनी सीबीआयने केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सुट्टीकालीन न्यायालयात यावर सुनावणी झाली. न्यायालयाने कोचर यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सुट्टीनंतर न्यायालयाचे कामकाज नियमित सुरु झाल्यावर या याचिकेवर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

आयसीआयसीआय बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना दिल्लीतून अटक केली. त्यानंतर व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांनाही सीबीआयने अटक केली.  हे प्रकरण सुमारे ३ हजार २५० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे. व्हिडिओकॉन समूहाला हे कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेने अनियमितता केल्याचा आरोप आहे. ही फसवणूक होत असताना चंदा कोचर या बँकेच्या सीईओ होत्या. याप्रकरणी सीबीआयने २४ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा नोंदवला. जानेवारी २०२० मध्ये ईडीने कोचर कुटुंबाची ७८ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -