घरमुंबईकोकण सरस विक्री प्रदर्शनात पारंपरिक वस्तूंना सर्वाधिक पसंती

कोकण सरस विक्री प्रदर्शनात पारंपरिक वस्तूंना सर्वाधिक पसंती

Subscribe

या प्रदर्शनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या विनर्स स्वयं सहायता समूहाच्या महिलांनी चहा पिण्याच्या कपापासून, लहानमुलांच्या बिगी बँक, ते जेवण करण्याची विविध भांडी विक्रीला आणली आहेत.

बारा बलुतेदारांच्या पारंपारिक व्यवसायाला त्याच समाजातील महिला, स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून आधुनिक व्यवसायाचा चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले ते, कोकण विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या कोकण सरस विक्री प्रदर्शनात. सिडको अर्बन हाट, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत विक्री प्रदर्शन सुरु राहणार आहे.

उरण मधील महिलांच्या वस्तू विक्रीला

या प्रदर्शनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या विनर्स स्वयं सहायता समूहाच्या महिलांनी चहा पिण्याच्या कपापासून, लहानमुलांच्या बिगी बँक, ते जेवण करण्याची विविध भांडी विक्रीला आणली आहेत. या महिला उरण येथील चिरणारच्या कुंभारपाड्यावरील आहेत. यांचा पारंपारिक व्यवसाय हा मातीची भांडी तयार करणे हाच आहे. यांच्या अनेक पिढ्यांनी मातीची भांडी विकण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यागत अनेक गावं पालथी घातली. गेल्या ५ वर्षापासून कुंभार समाजातील दहा महिलांनी एकत्र येत बचत गटांची स्थापना केली आणि वडिलोपार्जीत कुंभार व्यवसायाला आधुनिकीकरणाचा आकार दिला. नुकतेच त्यांनी स्वयं सहायता समूहाची ऑनलाइन नोंदणी केली. सध्याच्या धावपळीच्या जगात, शहरात राहणाऱ्या माणसाकडून मातीच्या भांडीची मागणी वाढू लागली असून व्यापारी घाऊक माल आमच्या दारावरूनच उचलतात. त्यामुळे दारातच चांगला धंदा मिळत असल्याचे पूनम हातनोलकर यांनी सांगितले. कोकण सरसमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

याच बरोबर सांगलीहून आलेला आदर्श स्वयं सहायता समूह चर्मकार समाजातील महिलांनी एकत्र येत सुरु केलेला बचत गट आहे. पारंपरिक व्यवसायाला शासकीय योजनाचा लाभ घेत महिला स्वयं सहायता समूहांना आर्थिक बळकटी येत आहे. सध्या सिडको अर्बन हाट, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत विक्री प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात कोकण, खानदेश येथील महिलांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन विभागीय कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -