घरमुंबईकांदळवनावरील अतिक्रमण प्रकरणी चोर सोडून संन्याशाला फाशी?

कांदळवनावरील अतिक्रमण प्रकरणी चोर सोडून संन्याशाला फाशी?

Subscribe

भूमाफिया, महसूल आणि पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.

बाळकूम येथील कांदळवन क्षेत्रातील झोपड्यांमधील रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, कांदळवनाची कत्तल करून अतिक्रमण करणारे भूमाफिया आणि या सगळया अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणारे महसूल आणि पालिकेचे अधिकारी मोकाट कसे? असा सवाल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. याशिवाय हा चोर सोडून संन्याशाला फासावर लटकवण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले आहेत. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि भूमाफियांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी डूंबरे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कांदळवनाची कत्तल करून अतिक्रण केले जात असल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने अनेकवेळा प्रकाशित केले होते. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागी झालं आहे.

बाळकूम येथील कांदळवनावर उभारलेली भंगाराची गोदामे, पक्की घरे आणि झोपड्यांवर महसूल विभागाने कारवाई करुन जमिनदोस्त केल्या. तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाप्रकरणी स्थानिक रहिवाशांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र कांदवळनाच्या कत्तलीला आणि अतिक्रमणाला एकटे रहिवाशीच जबाबदार कसे? असा प्रश्न नगरसेवक डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. कांदळवनाची कत्तल करणारे आणि अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया हे सुध्दा तितकेच जबाबदार आहेत, तसेच या सगळ्यांकडे कानाडोळा करणारे महसूल विभागाची यंत्रणा, शहरातील अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी असलेले सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभागाकडून कांदळवनावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

- Advertisement -

या भागात पालिका प्रशासनाकडून पायवाटा, पाणीपुरवठा आदी सोयी सुविधा पुरविल्या गेल्या आहे. तसेच महावितरण कंपनीकडून मीटर देऊन वीजपुरवठा देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने चोर सोडून संन्याशाला फासावर लटकावण्याचा हा प्रयत्न आहे. गोरगरीब आणि निराधार रहिवाशांऐवजी बेजबाबदार महसूल आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगरसेवक डुंबरे यांनी केली आहे. या प्रकरणी अद्यापी भूमाफियांवर गुन्हा नोंदविलेला नाही, याकडेही डुंबरे यांनी लक्ष वेधले.

ठाणे शहरातील सरकारी भूखंड अतिक्रमणांपासून वाचविण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? हे निश्चित करण्याची वेळ आली आहे. तसेच सरकारी आणि महापालिकेच्या जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी धोरण तयार करावे याकडेही डूंबरे यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगरसेवक डूंबरे यांच्या मागणीनंतर महसूल आणि पालिका प्रशासन काय कार्यवाही करते? याकडे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

खाडीकिनारी बेकायदेशीर डेब्रीज

ठाणे खाडी किनारी बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे डेबरीजचे भराव टाकले जात आहे. हळूहळू डेब्रीजचा भरणा केल्यानंतर खाडी बजवून त्यावर अनाधिकृत बेकायदेशीर झोपडपट्टया व चाळी व इमारत बांधली जातात. ठाणे खाडी किनारी हे दृश्य आजही दिसून येत आहे. खुला CRZ नियमानंचे ,अधिसुचनांचे , उल्लंघन केले जात आहे. मात्र अनधिकृत चाळी झोपडया व इमारती उभारण्याची प्रशासन वाट पाहते का ? असाच प्रश्न यानिमित्त पर्यावरण प्रेमींमध्ये उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -