घरमुंबईKshitij Zarapkar Death: अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन

Kshitij Zarapkar Death: अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन

Subscribe

अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई: एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Kshitij Zarapkar Death Actor Kshitij Zarapkar passed away due to cancer)

आज, 5 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांची मुंबईतील एका खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मागील अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

- Advertisement -

उत्तम अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक

क्षितीज झारापकर हे उत्तम अभिनेते तर होतेच. शिवाय ते लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, ठेंगा यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे. ते हा चर्चा तर होणारच या आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

एक अभ्यासू नट, एक अभ्यासू दिग्दर्शक अशी क्षितीज यांची ओळख होती. त्यामुळे आज मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील एक अभ्यासू नट हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनेक कथांमध्ये, सिनेमांमध्ये एक मेसेज दिला जायचा. तो मेसेज समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा.

- Advertisement -

(हेही वाचा: Raj Thackeray : सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर…; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा)


Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -