घरमुंबईलहुजी संघर्ष सेनेचे उठाबशा आंदोलन

लहुजी संघर्ष सेनेचे उठाबशा आंदोलन

Subscribe

मातंग समाजाज्या विविध मागण्यांसाठी उल्हासनगरच्या तहसिलदारांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत. याविषयी अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील देखील प्रशासना कडून लक्ष दिले जात नाव्हते. त्यामुळे आपल्या मादण्यां विषयी लक्ष वेधुन घेण्यासाठी उल्हासनगर तहसिलदार कार्यालयासमोर लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे ढोल वाजवत उठबशा आंदोलन करण्यात आले.

महिलांच्या हस्ते निवेदन

यावेळी विविध आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकार पर्यंत पोचवण्यासाठी नायब तहसिलदार यांना देण्यात आले. लहुजी संघर्ष सेना महिला पदाधिकारी सोनी धुळे सावित्रीबाई पाखरे, शालुबाई सोनावणे, कविता हजारे, नंदाबाई शिंदे यांच्या हस्ते नायब तहसिलदार गवई यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

या आहेत मागण्या

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे, मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करणे, मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणे, सत्यशोधक मुक्ता साळवे युवा पुरस्कार चालु करणे छत्रपती शिवाजी महाराज लहुजी साळवे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारकांच्या कामांना लवकरात लवकर सुरूवात करणे, उल्हासनगर महानगरपालिकेतील अण्णाभाऊ साठे जयंती निधी मध्ये भ्रष्टाचार करणा-या अधिका-यांवर कार्यवाही करणे आदी मागण्या ढोल वाजवत व उठाबशा करून हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी लहुजी संघर्ष सेना महासचिव दिपक सोनोने, संघटक समाधान अंभोरे, यांच्यासह शकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, लहुजी संघर्ष सेनेच्या या अनोख्या अशा उठाबशा आंदोलन तरी त्यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणे औत्सूक्याच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -