घरमुंबईमुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त

मुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त

Subscribe

मुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईमध्ये मोठी धडक कारवाई केली असून यात विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जोगेश्वरी येथे १० लाखांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. उत्पादन शुल्क विभागाने सातांक्रुझ येथे जेठालाल नामक व्यक्तीला बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करताना अटक केली. या व्यक्तीकडे एक लिटरच्या ६ ब्लक लेबल बनावट व्हीस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्याने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यास जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मद्याची निर्मिती करण्यात येत असल्याची माहीती मिळाली.

हेही वाचा – पुण्यात मद्यधुंद महिलेने नॅनो गाडीला धडक देत पोलिसांसोबत केली अरेरावी

- Advertisement -

उच्चभ्रू वस्तीत ड्युटी फ्री म्हणून मद्याची विक्री

जोगेश्वरी येथील मजासगाव टेकडीमध्ये कैलासपती चाळीत ही टोळी सक्रीय होती. या कारवाईत 77×1000 मिली बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार बाटल्या, 37×750 मिली भरतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, 10×2000 मिली भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, देशी दारू, 336 x 1000 मिली विदेशी मद्य विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, विविध विदेशी मद्य बाटल्यांचे बनावट बुचे इतर साहित्यासह एकूण १० लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होती. उच्चभ्रू वस्तीतील लोकांना हे मद्य ड्युटी फ्री म्हणून विकले जात होते. भारतीय बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या वेगवेळया ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांनमध्ये भरले जायचे.त्यावर बनावट बुचाच्या सहाय्याने सिलबंद केले जायाचे. उच्चभ्रु वस्तीतील नागरिकांना ड्युटी फ्री शॉपचे मद्य असल्याचे सांगून अधिकृत दुकानांच्या किमतीपेक्षा कमी किंमतीत विक्री केली जायची. या गुन्हातील मुळ सुत्रधार आणि त्यास बनावट बुचे पुरवठा करणारा इसम हे दोघे फरार आहेत. अशा प्रकारे बनावट भेसळयुक्त मद्य शरीरास हानीकारक असून नागरीकांना शासनाच्या अधिकृत दुकानामधून मद्य खरेदी करण्याचे आव्हान केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -