घरमुंबई'लालबागचा राजा'चे पहिले दर्शन!

‘लालबागचा राजा’चे पहिले दर्शन!

Subscribe

लालबागचा राजाचे पहिले दर्शन प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात आले आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचे मुखदर्शन गणेश चतुर्थीच्या आधी दिले जाते. यंदाही लालबागच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी भाविकांची सोशल मीडियावर गर्दी जमली.

यंदाच्या लालबागचा राजाचा देखावा असा असेल…

लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा देखावा भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ च्या कार्य कर्तुत्वाला सलाम करणारा साकारला आहे. नुकतेच इस्त्रोने अवकाशात सोडलेले ‘चांद्रयान २’ चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ मधून लँडर ‘विक्रम’ ७ सप्टेंबर २०१९रोजी पहाटे चांद्रभूमीवर साँफ्ट लँडिंग करणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारेच साक्षीदार होणार आहोत. सर्व भारतीयांचा देशाभिमान जागृत करणारा हा ऐतिहासिक क्षण लालबागच्या राजाच्या दरबारात थेट पहाताही येणार आहे. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा चांद्रभूमीवर विराजमान झाला आहे. चांद्रभूमीवर विराजमान झालेला लालबागचा राजा जणूकाही भारताच्या ‘चांद्रयान २’ चे राजेशाही स्वागतच करत आहे. भारताच्या ‘चांद्रयान २’ मोहिमेसोबत भविष्यातील ‘गगनयान’ या भारतीय अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या मोहिमेसाठीही लालबागचा राजा राजेशाही शुभेच्छा देत आहे. भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी इस्त्रो करत असलेल्या ऐतिहासीक कामगिरीचा गौरवच यंदा लालबागाच्या राजाच्या राजेशाही दरबारात आपल्याला पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

आपणही घेऊ शकता लालबागचा राजाचे दर्शन फक्त माय महानगरवर…

#Live : 'लालबागचा राजा' मुखदर्शन सोहळा लाईव्हमुंबईतील प्रसिद्ध आणि गणेशभक्तांच्या लाडक्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घ्या आता घरबसल्या फक्त मायमहानगरवर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 30, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -