घरमुंबईएमए, एमफीलचा निकाल जाहीर

एमए, एमफीलचा निकाल जाहीर

Subscribe

एमए भाग १ (सत्र १), एमए भाग २ (सत्र ४) आणि एमफील (इन कॉमर्स) या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला असून पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापीठाने नुकताच एमए भाग १ (सत्र १), एमए भाग २ (सत्र ४) आणि एमफील (इन कॉमर्स) या परीक्षांचा निकाल जाहीर केला. हा निकाल विद्यापीठाच्या संकेत स्थळावर www.mu.ac.in प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकन हवे असल्यास विहित (नमूद केलेल्या) कालावधीत अर्ज करणे आवश्यक असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

हेही वाचा – निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया – सहारिया

असा आहे निकाल

एमए भाग १ (सत्र १) या परीक्षेत ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर ४३४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील १२७ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. एमए भाग १ (सत्र १) या परीक्षेचा ५४.०४% एवढा निकाल लागला. तर एमए भाग २ (सत्र ४) या परीक्षेत १ हजार ६७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १ हजार ६६१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील १ हजार १७४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ८०.१०% एवढी आहे. एमफील (इन कॉमर्स) या परीक्षेत नोंदणी करून परीक्षेस बसलेल्या ६ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ६६.६७% एवढी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -