घरमुंबईLok Sabha : उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचा असेल तर...; संजय...

Lok Sabha : उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचा असेल तर…; संजय राऊत असं का म्हणाले?

Subscribe

उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचं असेल तर बदलू शकतात, आमचा नसीम खान यांना विरोध नाही, असे संजय राऊत म्हणाले.

नाशिक : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आल्यानंतर नाराज असलेल्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. असे असले तरी काँग्रेसला अजूनही उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार बदलायचं असेल तर ते बदलू शकतात. आमचा नसीम खान यांना विरोध नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबई जागेचा प्रश्न अद्यापही सुटल्याचे चित्र नाही. ते आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lok Sabha Election 2024 North Central Mumbai constituency Sanjay Raut varsha gaikwad nasim khan congress)

नसीम खान यांच्या उमेदवारीबद्दलही संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नसीम खान मुंबई काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना निवडणूक लढवायची होती. माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं बोलण झालं होतं. नसीम खान यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही बोललो नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेकडे ज्या जागा आहेत, तो त्यांचा निर्णय आहे. अजूनही काँग्रेसला वाटत असेल, उमेदवार बदलून नसीम खान यांना उमेदवारी द्यावी, तर तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही मविआ धर्माच पालन करू आणि नसीम खान यांना निवडून आणू. नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका

मोदींचा खोटं बोलण्यात जागतिक विक्रम (Modi’s world record in lying)

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. मुंबईला कंगाल करायचं आहे. हे सर्व करताना त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अडचण होत होती. म्हणून त्यांनी सरकार पाडलं. मोदी आणि शहांना भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल. परंतु मोदी गेल्या दहा वर्षांपासून सतत खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्याचा त्यांचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात जाईल. परंतु खोटं बोलण्याचा विक्रम ऑलम्पिकमध्ये जाईल का? हे पाहायला हवं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

नाशिकच्या दोन्ही जागा जिंकू (Nashik both seats will win)

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राजाभाऊ वाजे यांना संजय राऊतांच्या हस्ते आज एबी फॉर्म देण्यात आला. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही. लोकं स्वतःहून येतात. राजाभाऊ वाजे आणि भगरे यांचे अर्ज आज दाखल होतील. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात येत आहेत. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती 

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -