घरमुंबईRavindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Subscribe

रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली करण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार असून ते बुधवारी (01 मे) अर्ज भरण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांची मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी लढत होणार आहे.  (Lok Sabha ELection 2024 Ravindra Waikar announced candidature from Mumbai North West Constituency)

मातोश्रीचे निकटवर्तीय असलेले रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांची ईडी चौकशीही सुरू आहे. ईडी चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सूत जुळवले आणि 10 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची लढत  महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; राऊतांचे मोदींना जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. जोगेश्वरीमधील राखीव भूखंडावर रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल उभे केल्याचा आरोप आहे. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असल्याचा आरोप करत ईडीने त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी एकटे आमदार वायकरच अडकलेले नाहीत तर त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : दासबोधाचा आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

ईडी चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सूत जुळवण्यात सुरुवात केली. रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दहिसरचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसळकर यांच्यावर गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थात 1 मार्चला वायकर शिंदे गटात प्रवेश करतील असे ठरले होते, मात्र तोही मुहूर्त टळला. यानंतर 10 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागेल.

उमेवदावारी मिळाल्यावर रवींद्र वायकर काय म्हणाले? (Ravindra Waikar What did say after getting the nomination?)

दरम्यान, उमेदवारी मिळाल्यावर रवींद्र वायकर यांनी आभार मानले असून लोक पुन्हा निवडून लोकसभेवर पाठवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. रवींद्र वायकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोगाने महायुतीतील शिवसेना पक्षाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक 2024 साठी मला महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. गेली 50 वर्षे समाजकारण आणि 35 वर्षे राजकारण करताना मुंबई व महाराष्ट्रातील प्रश्न सोडविताना सर्व सामान्य जनतेची जशी भक्कम साथ आजतागायत मिळाली तशीच साथ लोकसभेतही मिळेल याची मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांचे प्रेम तसेच आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवीन. आपण मला भरघोस मतांनी निवडून देत आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी लोकसभेत पाठवाल अशी मला खात्री आहे, असा विश्वास रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -