घरदेश-विदेशदेशाच्या उभारणीत मध्यमवर्गीयांचे मोठे योगदान

देशाच्या उभारणीत मध्यमवर्गीयांचे मोठे योगदान

Subscribe

पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना गोंजारले,उद्धव ठाकरेंना म्हणाले माझा लहान भाऊ

सर्वात कमी महागाई आणि सर्वात वेगवान विकास हे देशात पहिल्यांदाच घडले. मध्यमवर्गीय आणि प्रामाणिक करदाते ही देशाची संपत्ती आहे. मध्यमवर्गीयांचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या बीकेसीमधील सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. आम्ही भ्रष्टाचार संपवला आणि करदातेही वाढवले, असेही ते म्हणाले.

मुंबईत झालेल्या महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गीयांना उद्देशून भाषण केले. ते म्हणाले की, आमची नीती काँग्रेसपेक्षा वेगळी आहे. मध्यमवर्गीयांच्या प्रामाणिकपणामुळेच मी अभूतपूर्व काम करू शकलो. करदात्या मध्य-मवर्गीयांमुळेच आयुष्यमान भारत योजना व्यवस्थित सुरू आहे. मध्यमवर्गीयांच्या योगदानामुळे गरिबांची धुरापासून मुक्तता झाली आहे. माझ्या एका आवाहनानंतर कोट्यवधी लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. मात्र काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मध्यमवर्गीयांचा साधा उल्लेखही नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

- Advertisement -

भाषणाच्या सुरूवातीलाच उद्धव यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख मोदींनी केला.तुम्ही सत्तेत बसवलं, नामदाराला कोर्टात खेचून आणलं. आता सत्ता द्या, नामदाराला तुरुंगात टाकतो. आम्ही भ्रष्टाचार संपवला आणि करदातेही वाढवले. आमच्या सत्ता काळात भ्रष्टाचाराची एकही बातमी नाही. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराच्या बातम्या गायब झाल्या, आम्ही घोटाळ्यांवर कठोर प्रहार केला. देशातील सर्वात जुन्या पक्षाला भरपूर संधी दिली. पण काँग्रेसवाले म्हणतात, मध्यमवर्गीयांना लालची आणि स्वार्थी म्हणत आहेत. कन्फ्यूजनचं दुसरं नाव म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी देशाची फसवणूक केली, असा टोला मोदींना हाणला.

मच्छिमार, सफाई कामगार आणि मध्यमवर्गीयांचं आभार मानायला आलो आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या काळात धावून येणार्‍या जवानांचं आभार मानायला आलोय, काळीपिवळी टॅक्सीवाल्यांचं आभार मानायला आलो आहे. मुंबईने आम्हाला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी तुमचे आभार मानायला आलो आहे.

- Advertisement -

पुढच्या पाच वर्षात भारताला प्रचंड संधी मिळणार आहे, त्यामुळे ही संधी वाया घालवू नका. टीव्हीवर आलात आणि पेपरमध्ये फोटो छापून आला म्हणजे भारतातील मतदार मतदान करतात का? स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला पहिल्यांदाच २०१४मध्ये ४४ जागा मिळाल्या, त्यामुळे २०१९मध्ये काँग्रेस सर्वात कमी जागा लढवत आहे. येणारी पाच वर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. जर भाजपचे सरकार येणार असेल काँग्रेसला मते देणे योग्य ठरेल की भाजपला योग्य ठरेल? मत बरबाद करणे योग्य की योग्य ठिकाणी मतदान करणे योग्य? काँग्रेसला ४० किंवा ५० जागा मिळतील असं सर्व्हे आहे. महायुतीलाच सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा सर्व सर्व्हेचा अंदाज आहे. भाजपला संपूर्ण बहुमत मिळणार असल्याचं सर्व संस्था संघटनांचा सर्व्हे आहे. आमच्या लाटेमुळे काही लोक खूपच वैतागले आहेत, पहिल्यांदा मतदान करणारे मोदींच्या पाठी का उभे आहेत, हेच त्यांना कळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी उपस्थित होते. त्यांबरोबरच रिपाइं नेते रामदास आठवले, शिवसेना नेते मनोहर जोशी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर व्यासपीठावर उपस्थित होते.

जे मनाने एकत्र नाहीत, ते सरकार कसे चालवणार?

शिवसेना-भाजपसह महायुतीतील सर्व घटक पक्ष आज महायुतीच्या सभेसाठी एकाच व्यासपीठावर आले आहेत. परंतु आम्हाला हरवण्यासाठी एकत्र आलेले पक्ष एकाच व्यासपीठावर का येत नाहीत? त्यांची एकही सभा का झाली नाही, असे सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजूनही एकत्र आलेले नाहीत.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांना मुंबईत येवून सभा घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळे मनाने जे एकत्र येत नाहीत ते सरकार कसे चालवणार, अशी टीका केली. महायुतीची जाहीर सभा शुक्रवारी वांद्रे कुर्ला संकुलात पार पडली. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजचे व उद्याचे पंतप्रधान असे संबोधत नरेंद्र मोदींचा परिचय करून दिला. महायुतीचे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले. परंतु आम्हाला हरवण्यासाठी ५६ पक्ष एकत्र आले आहेत.

त्यांची एकही सभा मुंबईत का झाली नाही असा सवाल त्यांनी केला. आघाडीची एकही सभा झालेली नाही. मी तरी पाहिलेली नाही. शरद पवार आणि राहुल गांधी एकत्र येत नाहीत. पण आम्ही महायुतीचे पक्ष एकत्र आहोत, याचा मला अभिमान वाटतो. आघाडीचा जाहीरनामा बघा आाणि महायुतीचा जाहीरनामा बघा असे सांगत जाहीरनामे बघून मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले. जो देशद्रोह करेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे असे सांगत आम्ही महायुती विचार करून केली आहे. आम्ही समविचारी आहोत. परंतु त्यांच्याकडे विचारच नाही. ते अविचारी केवळ पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत. आम्ही मिनिमम नाहीतर मॅक्झिममचा विचार करतो. मागील निवडणुकीतही मुंबई आपल्या पाठिशी आणि सोबत राहिली होती, यंदाही राहिली असे सांगत जास्तीत जास्त नाही तर बहुमताने उमेदवार निवडून येतील, असे वचन उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

२०१४ ला लाट होती, 2019 ला त्सुनामी

मागील २०१४ च्या निवडणुकीत जर मोदींची लाट होती असे मानले तर २०१९ला त्सुनामी असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जंगलामध्ये निवडणूक होती. कोल्हे आणि लांडगे एकत्र सोबत पोपट घेतला आणि सिंहावर आरोप करायला लागले. पण जंगलांमध्ये वाघ आणि सिंह एकत्र आले. ही फक्त गोष्ट आहे.कोण लांडगा आणि कोण पोपट हे विचारु नका. जनतेला हे माहीत आहे की वाघ कोण आणि सिंह कोण. ही जोडी एकत्र आहे. 2014 ची निवडणूक मोदीजी आम्ही तुमच्या नावाने जिंकली पण आता 2019 ची निवडणूक आम्ही तुमच्या कामाने जिंकणार आहोत,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -