घरलाईफस्टाईलफॅशन ट्रान्सपरंट टॉपची

फॅशन ट्रान्सपरंट टॉपची

Subscribe

सध्या तरुणाई पेहेराव, केशरचनेविषयी अधिक चोखंदळ झालेली दिसते. बदलत्या ऋतुमानानुसार तरुणाईची फॅशन बदलत असल्याचे चित्र आहे. तरुणांप्रमाणेच तरुणीही फॅशनेबल राहण्यास पसंती दर्शवत आहेत. सध्या बाजारात चलती आहे ती चायना जीन्स व त्यावर घालण्यात येणार्‍या ट्रान्सपरंट टॉपची. या टॉपमधून इनर घातले जाते.

इनरची किंमत ५० पासून २०० रुपयांपर्यंत असते. तर या टॉपची किंमत १५० ते ४०० रुपयांपर्यंत असते. ही फॅशन सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी आहे. या टॉपचा फायदा उन्हाळ्यात व पावसाळ्यात खूप होतो. हे टॉप उन्हाळ्यात घातले की गरम होत नाही व पावसाळ्यात घातले की लवकर सुकते.

- Advertisement -

त्या जीन्स व टॉपवर तरुणी डिझाईनर लॉकेट वेअर करतात. हातात प्रिंटेड बांगड्या व कानामध्ये मोठ्या आकाराचे कानातले सिल्वर किंवा गोल्डमध्ये घालतात. या टॉपमध्ये निळा, गुलाबी, पांढरा, काळा अशा रंगांना जास्त मागणी आहे. पण एक मात्र खरं बदलत्या काळानुसार आपले राहणीमान बदलत राहावे ही चांगली सवय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -