घरमुंबईमी सभेला जाणारच - चंद्रशेखर आझाद

मी सभेला जाणारच – चंद्रशेखर आझाद

Subscribe

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. मालाड येथील एका हॉटेलबाहेर जमावबंद ठेवण्यात आला आहे. मात्र मी सभेला जाणारच अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिली आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. काल रात्री पासून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्यामुळे आता तणावाचे वातावरण निर्माण होतांना दिसत आहे. मालाड येथील एका हॉटेल बाहेर लोकांनी एकच गर्दी केली आहे. आपण गुन्हेगार नसल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले आहे. मात्र आझादला विमानाने परत घरी जाण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहे. आर्मी मिशन संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे सध्या मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. ते मुंबईत आल्यापासून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आहे. आज त्यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच शुक्रवारपासून पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवले होते. महाराष्ट्रात संविधानाच्या अधिकारांची सर्रास पायमल्ली होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमध्यमांना बोलतांना सांगितले आहे.

काय म्हणाले आझाद

आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असल्यामुळे प्रसार माध्यमांना त्यांच्याहून दूर ठेवण्यात आले आहे. मात्र आझाद यांना फोनवरून एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणाले की,”माझ काहीही बर-वाईट झाल्यास त्याला जावाबदार हे सरकार असेल. महाराष्ट्रात घटनेची पायमल्ली सर्रास केली जात आहे. मी आरोपी नाही तरीही मला नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. मला चैत्यभूमीवर जाण्यापासून थांबवले जात आहे. हा संविधाचा अपमान आहे.”

- Advertisement -

आज होणार आहे सभा

चंद्रशेखर आझाद यांनी वरळी येथे सभेचे आयोजन केले आहे. ही सभा आज होणार आहे. मात्र या सभेला पोलिसांनी परवनगी दिली नाही. चंद्रशेख हे मालाड येथील मनाली हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांना या हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवण्यत आले आहे. याची माहिती भिम आर्मीला मिळताच त्यांनी हॉटेल बाहेर निदर्शने केली. सध्या मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -