घरमुंबईस्पीडपोस्ट सेवेत महाराष्ट्र अव्वल स्थानी

स्पीडपोस्ट सेवेत महाराष्ट्र अव्वल स्थानी

Subscribe

महिन्याला कोटींहून अधिक पार्सलची डिलिव्हरी

स्पीड पोस्टचा जलद पर्याय देण्यासाठी महाराष्ट्राने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. बिझनेस पोस्ट, ई- कॉमर्स पार्सल, पार्सल, बल्क बुकिंग यासारख्या अनेक सुविधांसाठी स्पीड पोस्टने मोठी कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक पार्सल बुकिंगसाठीचा आकडा गाठण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून सध्या महिन्यापोटी १ कोटी १ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या पार्सल बुक करण्यात येत आहेत. तर ६७.५ लाख पार्सल्स हे राज्याअंतर्गतच डिलिव्हरी करण्यात येतात. महाराष्ट्रातील सर्वाधिक पार्सल्स हे एकट्या मुंबईतून बुक होतात. महिन्यापोटी राज्यात बुक होणार्‍या १ कोटीहून अधिक पार्सलमध्ये मुंबईचा वाटा हा ७० लाख इतका आहे.

- Advertisement -

मुंबईतील आग्रीपाडा पोस्ट ऑफिसमधून दिवसाला १ लाख ते दीड लाख इतक्या मोठ्या प्रमाणात पार्सल बुक होण्याचे प्रमाण आहे. महत्वाचे म्हणजे देशभरात बुक होणार्‍या स्पीड पोस्ट डिलिव्हरीमध्ये महाराष्ट्रातून निर्माण होणारा महसूल हा १६ टक्के इतका आहे.

ई कॉमर्स, कॉर्पोरेट पार्सलची उलाढाल

- Advertisement -

राज्यात ई- कॉमर्स आणि कॉर्पोरेट मेलसाठी स्पीड पोस्टचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. बल्क मेलसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून स्पीड पोस्टचा वापर करण्यात येत आहे. पोस्टाकडे बल्क पार्सलसाठी ३२ ग्राहक आहेत. तर ई कॉमर्ससाठी २५० ग्राहक आहेत. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, नापतोल यासारख्या कंपन्यांकडून पोस्टाकडे दिवसाला ३५०० इतके पार्सल डिलिव्हरी करण्यात येतात. अनेक ई- कॉमर्स कंपन्यांसाठी कॅश ऑन डिलिव्हरीसाठी पोस्टाकडून पैसे गोळा करण्याचेही काम करण्यात येते, अशी माहिती महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीश अग्रवाल यांनी दिली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -