घरमुंबईरूळावर प्रात:विधी करणे महागात

रूळावर प्रात:विधी करणे महागात

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रूळालगत शौचास जाण्याचीआणि कचरा फेकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती.त्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून तक्रारी सुध्दा प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळानजीक प्रात:विधी करणार्‍या 439 नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 लाखांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

एकीकडे सरकार मुक्त झाल्याचे सांगत असताना, दुसरीकडे रेल्वे पोलिसांच्या कारवाईचे आकडे हागणदारी मुक्तीची पोल खोल करते आहे. रेल्वे मार्गावर कचरा फेकू नयेे, रेल्वे रुळावर शौचालय करू नये, यासंबंधी रेल्वेकडून अनेकदा जनजागृती कार्यक्रम चालविण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात यात काही कमी होताना दिसून येत नाही. पश्चिम रेल्वेच्या माहिम रेल्वे स्थानकादरम्यान लोकल जात असताना प्रवासी नाकावर रूमाल ठेवून प्रवास करत असल्याचे चित्र होते. यासंबंधी अनेक रेल्वे प्रवाशांनी तक्रारी सुध्दा केल्या होत्या.

- Advertisement -

या तक्रारींना लक्षात घेता पश्चिम मार्गावर आरपीएफ पोलिसांनी कारवाई अभियान राबविले होते. रात्री आणि सकाळी रेल्वे रुळांवर रेल्वे पोलीस गस्त लावण्यात आली होती. कचरा फेकणार्‍या आणि रेल्वे रुळानजिक शौचास बसणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. 2017 ते 2018 या तीन वर्षांच्या कालावधीत पश्चिम रेल्वेने रेल्वे रुळांवर कचरा फेकणार्‍या आणि प्रात:विधी करणार्‍या 1 हजार 559 नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून 8 लाख 90 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वर्ष प्रकरण दंड
2017 -490 -258400

- Advertisement -

2018 -607 -362500

2019 -462 -2,69,500
…………………………………..
एकूण   1559 -8,90,400
………………………………………..

पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील माहिम रेल्वे स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कचरा फेकला जातो तसेच रूळावर प्रात:विधी केली जात होती. यावर आळा बसावा यासाठी रेल्वे पोलिसांची गस्त ठेवण्यात आली आणि प्रात:विधी करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली. -जे.पी.मीना, पोलीस निरीक्षक, आरपीएफ दादर 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -