घरमुंबईदादरच्या अटलांटिक प्लाझा इमारतीला भीषण आग

दादरच्या अटलांटिक प्लाझा इमारतीला भीषण आग

Subscribe

मुंबईमध्ये आणखी एका इमारतीला आग लागली आहे. दादरच्या अटलांटिक प्लाझा या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईमध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. दादरच्या अटलांटिक प्लाझा इमारतीला भीषण आग लागली आहे. गैरेग गल्लीमध्ये ही इमारत आहे. या इमारतीच्या ५ व्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे मुंबईमध्ये सकाळपासून दोन इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दादर परिसरातील अटलांटिक प्लाझा या इमारतीला अचानक आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

- Advertisement -

आज सकाळी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलजवळ इमारतीला आग लागली होती. भेंडीबाजारमधील एका इमारतीला आग लागली होती. काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -