घरमुंबईप्लॉस्टिक बंदीसाठी एकच कायदा करा

प्लॉस्टिक बंदीसाठी एकच कायदा करा

Subscribe

आदित्य ठाकरे यांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच झालेल्या १५ ऑगस्टच्या भाषणात प्लॉस्टिक बंदीची हाक दिली होती. मोदींच्या या घोषणेला शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाठींबा दर्शविला आहे. हा पाठींबा दर्शविताना देशभरात प्लॉस्टिक बंदीसाठी एकच कायद्या करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर राज्यात जी प्लॉस्टिक बंदी झाली. त्यामुळे कचार्‍याच्या प्रमाणात देखील फरक दिसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्लॉस्टिक बंदीच्या संदर्भात पाठींबा दर्शविताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी युवा सेनेचे सूरज चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, १५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान माननीय मोदीजींच्या भाषणात त्यांनी सांगितले की, आपण प्लास्टिक मुक्त होऊ शकतो, ही बाब विचार करण्यासारखी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी साहेबांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय देशा समोर ठेवला आहे. तर आज भारतामध्ये आणि जगामध्ये सर्वच ठिकाणी प्लास्टिक बंद होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. पूर्णपणे प्लास्टिक बंदी जर केली तर त्याचा पर्यावरणावर खूप चांगला परिणाम दिसून येईल. प्लास्टिक बंदी वरती लवकरात लवकर कायदा येणे सुद्धा गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

यावेळी ते पुढे म्हणाले की, आज भारतातील २० राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी लागू झालेली आहे. त्यामुळे वातावरणामध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत वेळी-अवेळी पाऊस त्याचबरोबर तापमानामध्ये वाढ या सर्व गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत. मुंबईच्या वेस्ट जनरेशन १० हजार मेट्रिक टन होतं त्यानंतर ते आपण ७ हजार मेट्रिक टनावर आणले प्लास्टिक बंदी नंतर अजून 500 मेट्रिक टन कमी झाले. तर आज १०० % प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी जागरुकता करणे गरजेचे आहे. जिथे जिथे प्लास्टिक वापर चालू आहे त्यावर आपण कारवाई करत आहोत.असे मत त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -