घरमुंबईअपघातांचे ठाणे !

अपघातांचे ठाणे !

Subscribe

 ठाण्यात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू

ठाण्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमधील असलेल्या गॅपमुळे बाईक स्लिप होऊन एका पाच वर्षांच्या चिमुरड्या जीव गमवावा लागला आहे.बाईक स्लिप झाल्याने पाठीमागून भरधाव येणारा टेम्पो या मुलाच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला . घोडबंदर रोडवरील वेदांत हॉस्पिटल समोर गुरुवारी ही घटना घडली असून घोडबंदर रोडवारी खराब रस्त्यांची धास्तीच आता वाहनचालकांनी घेतली आहे. वेदांत दास असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून टेम्पो चालकाच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी विक्रांत दास हे मोटारसायकलवरुन आपली पत्नी अंजुला आणि आपला पाच वर्षाचा मुलगा वेदांत आपल्या नातेवाईकांकडे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला घोडबंदरकडे जात होते . वेदांत हॉस्पिटल समोर रस्ता उंच सखल असल्याने या सिमेंट काँक्रीटच्या गॅपमध्ये त्यांनी बाईक अडकली स्लिप झाल्याने तिघेही रस्त्यावर पडले. यावेळी पाठीमागून येणार्‍या भरधाव वेगाने येणारा टेम्पो वेदांतच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कासारवडवली पोलिसांनी आरोपी वाहन चालक अविनाश टावरे (४५) याला अटक केली आहे.

तर दुसरीकडे ठाण्यात मुंब्रा बायपासवरील दिवसेंदिवस जीवघेण्या होत जाणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले असतानाच हा रस्ता देखील मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. भरधाव वेगात चाललेल्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार 28 वर्षीय तरुणाला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथे राहणारे आसिफ शेख (25) व त्यांचा मित्र अझर सलामत शेख (28) हे दोघेही मित्र शुक्रवारी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास मुंब्राकडून ठाण्याच्या दिशेने येत होते. यावेळी मुंब्रा बायपास येथील रेतीबंदर जवळ एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या धडकेत आसिफ यांच्या उजव्या हाताला व पायाला दुखापत झाली. तर अझरच्या गुप्तांगास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -