घरमुंबईबिहारच्या नराधमाला मनसेचा चोप

बिहारच्या नराधमाला मनसेचा चोप

Subscribe

आज पत्रकार परिषदेत मनसेने नराधामाला चोप दिला आहे. हा नराधम अडिच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत होता.

एक ५३ वर्षीय इसम अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमधील नराधमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले आहे. ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला चोप दिला. दरम्यान, अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत उत्तर भारतीयांवर घणाघात केला आहे. युपी, बिहार आणि झारखंडच्या नराधमांकडून अशा घटना जर सारख्या घडत असतील, तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अविनाश जाधव यांनी केला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

गुरुवारी एका बागेमध्ये ही घटना घडली. एक उत्तर भारतीय पुरुष अडीच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत होता. ही बाब तेथील एका तरुणाच्या लक्षात आल्यावर त्याने व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गैरप्रकार घडू नये म्हणून तो तरुण त्या नराधमास मारायला गेला. त्याच्या सोबत आणखी काही स्थानिकांनी नराधमाला चोप दिला. त्यानंतर तो नराधम तिथून पळून गेला. हा नराधम आज सकाळी मनसेंच्या कार्यकर्त्यांना सापडला. मनसेने या नराधमाला पत्रकार परिषदेत आणले. हा नराधम मुळचा बिहारचा आहे. त्याने तीन मुलींवर अत्याचार केला असून, त्याने या कृत्याची कबूली दिली असल्याचे आशिष जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला चोप दिला.

- Advertisement -

हे जर थांबले नाही तर आम्ही मारुन मारुन बाहेर काढू – अविनाश जाधव

उत्तर भारतीय लोकांकडून वारंवार या घटना घडत आहे. याअगोदर नवी मुंबई, ठाण्यामध्ये हा प्रकार घडला होता. अत्याचार करणारे नराधम युपी, बिहार आणि झारखंडमधून येतात आणि इथे घाण करतात, असं अविनाश जाधव म्हणाले. हे प्रकार जर थांपबले नाही तर आम्ही मारुन मारुन बाहेर काढू असेही अविनाश जाधव म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -