घरमुंबईमराठा क्रांती मोर्चा आणि मेडिकल विद्यार्थ्यांची बैठक सुरू

मराठा क्रांती मोर्चा आणि मेडिकल विद्यार्थ्यांची बैठक सुरू

Subscribe

आम्हाला आश्वासन नको, मेडिकलच्या सीट द्या अशी मागणी मराठा विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही मुंबईतल्या आझाद मैदानात विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांची सरकारी आणि खासगी महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्काची रक्कम सरकार भरण्यास तयार आहे. मात्र आम्हाला आश्वासन नको, मेडिकलच्या सीट द्या अशी मागणी मराठा विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे.

या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मेडिकल विद्यार्थ्यांबरोबर दादरच्या शिवाजी मंदिरात सुरू झाली आहे. सरकारने दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्‍नांवर निर्णय घेतला नाही तर मराठा रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करतील असा या बैठकीत सुर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -