घरमुंबईपोलीस वसाहतीच्या आगीत १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पोलीस वसाहतीच्या आगीत १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Subscribe

सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. मात्र एक जण जखमी झाला आहे.

दादर पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या पोलीस वसाहतीतील इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीत लागलेल्या आगीत १५ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीत मृत्यू पावलेल्या मुलीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली असल्याची शक्यता अग्निशमक दलाकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नसून दादर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे. श्रावणी अशोक चव्हाण (१५) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

दादर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस वसाहतीत असलेल्या एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीत रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली, काही वेळात आग लागलेल्या इमारतीच्या खोलीत सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचे लोळ खिडकीवाटे बाहेर पडत होते. दादर पोलिसांनी ताबडतोब इमारतीत राहणार्‍या इतर कुटुंबीयांना इमारत खाली करण्याचे आवाहन केले. या आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग लागलेल्या खोलीकडे धाव घेतली असता त्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे लक्षात आले, दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी कुलूप तोडून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत अग्निशामक दलाला खोलीत जळलेल्या अवस्थेत १५ वर्षांची मुलगी मिळून आली तिला ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्नालयात आणण्यात आले, मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगतले.

- Advertisement -

श्रावणी अशोक चव्हाण असे या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती आई वडिलांसोबत सदर ठिकाणी राहण्यास होती. श्रावणीचे वडील पोलीस दलात असून रविवारी सकाळी श्रावणीला घरात एकटेच सोडून तिचे आईबाबा बाहेरून घराला कुलूप लावून एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्या दरम्यान श्रावणीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली असावी, त्यातूनच हि आग लागून सिलेंडरने पेट घेतला असावा अशी शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाला घटनास्थळी रॉकेलची एक रिकामी बॉटल देखील मिळून आली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -