घरमुंबईसोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे भोसले राहणार उपस्थित

सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे भोसले राहणार उपस्थित

Subscribe

मराठा आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी आकस मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेले आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे भोसले हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे येथे आक्रोश होणार असून शेकडोंच्या संख्येने मुंबई व इतर परिसरातील मराठा समाज एकत्रित आक्रोश आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मागील दीड महिन्यामध्ये सरकारतर्फे कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच आज मराठा समाज त्यामुळे शैक्षणिक व नोकरीतील संधीपासून वंछित राहत आहेत.

- Advertisement -

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान या वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये झाले आहे. सरकार त्या संदर्भात कुठलीही पाऊले उचलताना दिसत नाही. मराठा समाजाचे आरक्षण हे सुप्रीम कोर्टात अडकल्यानंतर राज्यसरकारने मराठा समाजाला मदत करण्याऐवजी मराठा समाज हा मिळणाऱ्या नवीन नोकरीपासून कसा वंचित राहील याचा पूर्व नियोजीत कट करून पहिल्यांदा १२ हजार पोलीस भरती व त्यानंतर आज ९ हजार उर्जा खात्यातील नोकऱ्या जाहीर करून मराठा समाजाच्या खांद्यावर हात ठेवून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे केले आहे. या नोकर भरती त्वरीत स्थगित करावेत व जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाहीत. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची नोकर भरती राज्य सरकारने करू नये, असे मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

२७ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण संदर्भात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्यावरती सुनावणी होणार आहे. परंतु यावेळी सरकारने त्या संदर्भामध्ये काय तयारी केली आहे व उपसमितीमध्ये कशाप्रकारे निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल यासाठी कुठली उपाययोजना केली आहे, याची कुठलीच कल्पना सरकारने मराठा समाज व त्यांच्या समन्वयांकांना वकिलांना दिलेली नाही, असेही वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनारुपी रावणाचा नाश करुया; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -