घरमुंबईमहिला डॉक्टरांसाठी मार्ड संघटनेची ‘छळ प्रतिबंधक मोहीम’

महिला डॉक्टरांसाठी मार्ड संघटनेची ‘छळ प्रतिबंधक मोहीम’

Subscribe

रुग्णांच्या नातेवाईंकाकडून अनेकदा डॉक्टर्सना मारहाण होते. पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी अनेकदा मागणी करण्यात आली होती. मात्र आता सेंट्रल मार्ड संघटनेने स्वतःच महिलांसाठी ‘छळ प्रतिबंधक मोहीम’ सुरू केली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेकदा डॉक्टरांना मारहाण केली जाते. कधीकधी बऱ्याचशा प्रकरणांमध्ये महिला डॉक्टरांनाही शिवीगाळ केली जाते. महिला डॉक्टरांना अनेकदा अश्लील शेरेबाजीलाही सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेने ‘छळ प्रतिबंधक मोहीम’ सुरू केली आहे. याअंतर्गत छळ प्रतिबंधक विभाग तयार करण्यात आला आहे.

सेंट्रल मार्डने सुरू केली मोहिम

सेंट्रल मार्डने सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील कुठल्याही पालिका आणि राज्य शासनाच्या महिला डॉक्टर अशा काही प्रकरणांची, समस्यांची तक्रार या विभागाकडे करू शकतात. याविषयी संघटनेने माहिती देताना सांगितले की, “अमेरिकेने एप्रिलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालात आरोग्यसेवा क्षेत्रातील ३० टक्के महिला त्यात डॉक्टर, परिचारिका, सेविका, कर्मचाऱ्यांना लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी आणि शिवीगाळ प्रकरणांना सामोरे जावे लागते. याखेरीज, कोलकाता येथील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातही १३५ पैकी ७७ महिला डॉक्टर, परिचारिका, सेविका, कर्मचाऱ्यांनाही अशा प्रकारच्या समस्या असल्याचे समोर आले आहे. हा अहवाल दोन शासकीय तर दोन खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

याविषयी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवाटकर यांनी सांगितले की, बऱ्याचदा राज्याच्या कानाकोपऱ्यातील रुग्णालय, दवाखान्यात अशी परिस्थिती उद्भवते. मात्र, घाबरून महिला डॉक्टर समोर येत नाही. अशा वेळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विभाग तयार करण्यात आला असून या अंतर्गत त्यांच्या समस्या, तक्रारी सोडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -