घरमहाराष्ट्रऔरंगाबादच्या एमआयएम नगरसेवकासह जिल्हाधिकाऱ्याला अटक

औरंगाबादच्या एमआयएम नगरसेवकासह जिल्हाधिकाऱ्याला अटक

Subscribe

वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतिन सैय्यदला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विरोध केल्याने भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी मतिन सैय्यदला मारहाण केली होती. याप्रकरणी भाजपच्या तीन नगरसेवकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोक प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतिन सैय्यद पोलिसांनी अटक केली आहे. मतिन सैय्यदविरोधात धार्मिक भावना दुखावणे, दंगा भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तसंच एमआयएमचे जिल्हाक्षक जावेद कुरेशीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

MIM Corporator beaten up by BJP and Shivsena Corporator for opposing to pay tribute to Atal Bihari Vajpayee

वाजपेयींच्या श्रध्दांजली प्रस्तावाला विरोध; MIM पक्षाच्या नगरसेवकाला चोपले | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Friday, August 17, 2018

- Advertisement -

श्रध्दांजली प्रस्तावाला केला होता विरोध

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांना देशभरातून श्रध्दांजली देण्यात आली. औरंगाबाद महापालिकेमध्ये वाजपेयी यांना श्रध्दांजली देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मतीन सैय्यद याने विरोध केला. त्यावेळी संतापलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतीन सैय्यद याला मारहाण करत सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर या नगरसेवकांनी त्याच्या निलंबनाची मागणी केली.

एमआयएमच्या जिल्हाधिकाऱ्याला देखील अटक

एमआयएम नगरसेवक मतिन सैय्यदसोबतच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशीला पोलिसांनी अटक केली आहे. जावेद कुरेशीवर पोलिसांच्या कामकाजात अडथळा, सरकारी कामात हस्तक्षेप आणि पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मतिन सैय्यदला मारहाण केल्यानंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करत गाडी चालकाला मारहाण केली होती.

- Advertisement -

भाजपच्या ३ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

एमआयएमचे नगरसेवक मतिन सैय्यदला मारहाण करणाऱ्या भाजप आणि शिवसेना नगरसेवकांविरोधाति देखील कारवाई केली जावी अशी मागणी एमआयएमने केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक प्रमोठ राठोड, विजय औताडे, राज वानखेडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -