घरमुंबईकल्याणातून आयटी इंजिनियर लखोबा गजाआड

कल्याणातून आयटी इंजिनियर लखोबा गजाआड

Subscribe

विवाहाच्या संकेतस्थळावरून उच्चशिक्षित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल सहा लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या भामट्याला कल्याण पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. शुभांकर बॅनर्जी (३४) असे या भामट्याचे नाव असून तो आयटी इंजिनिअर आहे.

विवाहाच्या संकेतस्थळावरून उच्चशिक्षित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल सहा लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या भामट्याला कल्याण पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. शुभांकर बॅनर्जी (३४) असे या भामट्याचे नाव असून तो आयटी इंजिनिअर आहे. आतापर्यंत त्याने जवळपास २५ तरुणींना फसवल्याचे उजेडात आले आहे. त्यातील बहुतांशी मुली या आयटी इंजिनिअर आहेत.

बंगळूर येथे राहणारा शुभांकर याने शादी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावर उच्चशिक्षित तरूणींची माहिती मिळवत होता. त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवत होता. त्यानंतर स्वत: गुगलमध्ये हॅकर्स, एटीएससाठी हॅकर्स म्हणून काम करीत असल्याचे सांगत होता. त्याच्या बोलण्यावर भूलून कल्याणातील उच्चशिक्षित तरूणी जाळ्यात फसली. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने वडील आजारी असल्याचे आणि इतर कारण सांगून तिच्याकडून तब्बल ६ लाख ८६ हजार ९९९ रूपये उकळले. त्यानंतर त्याने नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केला तसेच त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. तरुणीने पैशाची मागणी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर त्या तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पेालिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

शुभांकरला अटक कशी करायची असा प्रश्न पोलिसांपुढे पडला होता. अखेर पोलिसांनी त्या तरूणीला विश्वासात घेत शुभांकरला एक लाख रूपये देण्याच्या बहाण्याने कल्याणला बोलावले. त्याचवेळी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तो अलगद सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यावेळी झालेल्या चौकशीत अशाच प्रकारे त्याने इतरही मुलींना फसवले असल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांशी मुली आयटी इंजिनियर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शुभंकरने आणखी कोणाकोणाला किती रकमेला फसवले आहे. याची माहिती पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -