घरमुंबईमाटुंगा रोड पादचारी पुलाचे नक्की झाले काय?

माटुंगा रोड पादचारी पुलाचे नक्की झाले काय?

Subscribe

ऐन गर्दीच्यावेळी हा पूल बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.

विचित्र स्टक्चरमुळे अनेकदा वादात सापडलेला पादचारी पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या पादचारी पुलाच्या स्लॅबचा भाग काही प्रमाणात धोकादायक ठरल्याने सोमवारी संध्याकाळी पादचार्‍याने केलेल्या तक्रारीनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला. ऐन गर्दीच्यावेळी हा पूल बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. मात्र, काही वेळानंतर  हा पूल पुन्हा सुरु करण्यात आला. वारंवार बंद करण्यात येणाऱ्या या पादचारी पुलाला नेमकं झालेय तरी काय असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला. हा पूल धोकादायक नसल्याचे यापूर्वीच महापालिकेने जाहीर केले आहे. परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने हा निर्णय घेतल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

माटुंगा रेल्वे स्थानक ते संत विश्वेश्वरय्या उड्डाणपुलाला जोडणार्‍या पादचारी पुलाला पुढील भागात रॅलिंगच्या खालील भागातील सिमेंट निखळले आहे. हे सिमेंटचे स्लॅब कोसळून खाली पडल्यास सेनापती बापट मार्गावरून जाणार्‍या पादचारी तथा वाहनाला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे एका हिंदुजा रुग्णालयातील कर्मचार्‍याने अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. त्यानुसार संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पादचाऱ्यांनी सिमेंटच्या निखळलेल्या काही भागांकडे अग्निशमन दलाचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी तात्काळ हे पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही काळानंतर हा पूल पुन्हा सुरु करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – 

माटुंगा रोड स्थानकाचा पादचारी पूल तोडणार

- Advertisement -

माटुंगा रोड स्थानकावरील पादचारी पुलाला तडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -