घरमुंबईमाटुंगा रोड स्थानकावरील पादचारी पुलाला तडे

माटुंगा रोड स्थानकावरील पादचारी पुलाला तडे

Subscribe

माटुंगा पश्चिम येथील रेल्वे पुलाल तडे गेल्याने पुल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी १५ जुलैपासून मुंबई महापालिकेने तडे गेल्याने पादचारी पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील पादचारी पुलांचा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा येथील पादचारी पुलाला तडा गेल्याने पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी १५ जुलैपासून मुंबई महापालिकेने तडे गेल्याने पादचारी पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुल एका बाजुने खाली झुकल्याने पुल धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी पादचाऱ्यांकडून या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दरम्यान, पुलाचा एक खांब ढासळण्याच्या स्थितीमध्ये असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देखील ग्रँट रोड येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा पुल देखील तात्काळ बंद करून त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती. पुलाची दुरूस्ती झाल्यानंतर ग्रॅट रोड येथील पुल दुरूस्तीसाठी खुला करण्यात आला.

- Advertisement -

अंधेरीतील पुल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

अंधेरीतील गोखले पुल दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर सर्व पुलांच्या ऑडिटचे आदेश देण्यात आले. गोखले पुल दुर्घटनेमध्ये जवळपास ५ लोक जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने हजारो रेल्वे प्रवाशांचे जीव वाचले होते. शिवाय, रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला होता. त्यामुळे जवळपास २० तासानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -