घरमुंबई२३ नोव्हेंबरपासून महापौर चषक शालेय कबड्डी स्पर्धा

२३ नोव्हेंबरपासून महापौर चषक शालेय कबड्डी स्पर्धा

Subscribe

शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्देश आहे. येत्या २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महापौर चषक शालेय कबड्डी स्पर्धा होणार आहे.

मुंबई महापौर चषक शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान श्रमिक जिमखान्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्देश आहे. स्पोर्ट्स असोशिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मनपा शारीरिक शिक्षण उपविभागाच्या सहकार्याने या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय खेळाडूंनी पूर्ण तयारीनिशी महापौर चषक पटकाविण्यासाठी शालेय कबड्डी स्पर्धेत खेळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेते- उपविजेत्यांना मिळणार ८ पुरस्कार

या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या- उपविजेत्यांसाठी एकूण ८ पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वोत्तम कबड्डीपटूस शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच स्पर्धेमधील सहभागी शालेय संघाच्या पूर्वतयारीसाठी मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहेत. टिळकनगर मनपा शाळेच्या क्रीडांगणात झालेल्या शालेय ६८ खेळाडूंच्या कबड्डी शिबिरात शिवछत्रपती पुरस्कार विजेते एनआयएस कबड्डी प्रशिक्षक मीनानाथ धानजी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, बंडू कांबळे आणि लीलाधर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -