घरमुंबईCCTV - नशीब बलवत्तर असल्याने गाडी अंगावरुन जाऊन देखील मुलगा वाचला

CCTV – नशीब बलवत्तर असल्याने गाडी अंगावरुन जाऊन देखील मुलगा वाचला

Subscribe

खेळणाऱ्या मुलाच्या अंगावरुन गाडी जावून देखील तो सुरक्षित असल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिला कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी आणखी एक घटना समोर आली आहे. ठाण्याच्या वर्तकनगर येथे अंगावरुन कार जावून देखील एक चिमुकला वाचला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २४ सप्टेंबरला संध्याकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. बुटाची लेस बांधणाऱ्या या मुलाच्या अंगावरुन कार जाते पण तो उठून पळू लागत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Miraculous: A small boy escaped under a car in vartak nagar

देव तारी त्याला कोण मारी | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Wednesday, 26 September 2018

- Advertisement -

अंगावरुन गाडी गेली पण तो वाचला

ठाण्याच्या वर्तकनगर परिसरामध्ये असणाऱ्या दोस्ती विहार बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये काही मुलं फुटबॉल खेळत होते. या मुलांमधील एका मुलाच्या बुटाची लेस सुटते. ती सेल तो खाली बसून बांधत असतो. त्यावेळी पार्किंमध्ये पार्क असलेली कार एक महिला चालू करते आणि ही गाडी या मुलाच्या अंगावरुन जाते. गाडी अंगावरुन गेली असल्याचे पाहिल्यावर कोणालाही वाटेल की, मुलगा चिरडला गेला. पण गाडी पुढे निघून गेल्यानंतर घाबरलेला मुलगा उठून रडत पळत जातो.

कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल

हे सीसीटीव्ही फूटेज अंगावर काटे आणणारे आहे. पण सीसीटीव्ही फूटेजमध्ये नीट पाहिले तर गाडीचालक महिलेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. पार्किंमध्ये मुलं खेळत असताना देखील ती फास्ट गाडी चालवत आहे. गाडीखाली कुठली ही एखादी वस्तू आली तरी आपल्याला कळते. पण तीने वेळा धक्का लागून देखील कारचालक महिलेने गाडी सुसाट घेऊन गेली. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर कारचालक महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -