घरताज्या घडामोडीDrug case : आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाइंड मोहित कंबोज, वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा...

Drug case : आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाइंड मोहित कंबोज, वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्य

Subscribe

आर्यनला प्रतिक गामा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून बोलावण्यात आले. मोहीत कंबोडियाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला.

मोहित कंबोज हा समीर वानखेडेचा पार्टनर असून त्याने आर्यन खानला ट्रॅप करुन त्याचे अपहरण केले. हे प्रकरण ड्रग्जचे नाही अपहरणाचे आहे. मोहीत कंबोज अपहरणाचा मास्टर माइंड आहे. मोहीत आणि वानखेडे यांचे चांगले संबंध असून वानखेडेंच्या प्रायव्हेट पार्टीचा मोहित कंबोज हा भाग असल्याचा खुलासा अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. मोहित कंबोजवर ११०० करोड रुपयांच्या बँक अफरातफरीचे आरोप आहेत. तो आधी काँग्रेस नेत्यांच्या मागे होता. मात्र सरकार बदलल्यानंतर तो भाजपकडे आल्याचे नवाब मलिकांनी सांगितले. मोहीत कंबोजने शनिवारी प्रेस कॉन्फरन्स घेत सुनील पाटील नामक व्यक्तीचे नाव घेऊन ही व्यक्ती या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचे सांगितले होते.

आर्यन खानचे संपूर्ण प्रकरण हे अपहरणाचे प्रकरण होते. आर्यन खान स्वत: कोणतेही तिकीट खदेरी करुन क्रूझवरील पार्टीसाठी गेला नव्हता. आर्यनला प्रतिक गामा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून बोलावण्यात आले. मोहीत कंबोडियाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. मोहित कंबोजचा मेहूणा आणि त्याचे दोन मित्र प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला त्याला घेऊन क्रूझवरील पार्टीलासाठी गेले होते. तिथे त्यांनी आर्यन खानला किडनॅप केले आणि २५ करोड रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मोहित कंबोज हा समीर वानखेडेचा खंडणी मागणारा पार्टनर आहे. मात्र एका सेल्फीने त्यांच्या खंडणीचा संपूर्ण खेळ फसला असे नवाब मलिकांनी सांगितले.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी आज आरोप करत म्हटले की, कंबोज आणि समीर वानखेडे यांचे फार चांगले संबंध आहेत. लवकरच त्यांच्या मिटींगचा व्हिडिओ जारी करु. ६ ऑक्टोबरला मी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ७ तारीखला वानखेडे आणि कंबोज ओशिवराच्या कब्रस्तानात भेटले होते. त्यांचे नशीब चांगले की तिथल्या पोलिसांचे सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळू शकले नाहीत. त्यानंतर समीर वानखेडेंना वाटले की त्यांचा कोणीतही पाठलाग करत आहे आणि त्यांनी तशी तक्रार पोलिसात केली, असे नवाब मलिकांनी सांगितले.

ड्रग्जचा धंदा सुरू रहावा हा एकच खेळ समीर वानखेडेंचा आहे. ड्रग्ज माफियांना संरक्षण देणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हेच काम समीर वानखेडे करतात. सिनेसृष्टीतील लोकांना घाबरवणे आणि त्यांच्याकडून हजारो करोड रुपयांची मागणी करणे हा घानेरडा खेळ समीर वानखेडे खेळत आहे. शाहरुख खानला देखील धमकी देण्यात आली होती. नवाब मलिकांनी बोलणे थांबवले नाही तर आर्यनखानच्या कोठडीत वाढ होईल असे सांगण्यात आल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Drug case: नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -