घरमुंबईपावासाळी अधिवेशनला १७ जूनपासून होणार सुरुवात

पावासाळी अधिवेशनला १७ जूनपासून होणार सुरुवात

Subscribe

पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी सादर केला जाणार आहे. यानंतर २१ आणि २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.

फडणवीस सरकारसाठी महत्त्वपूर्ण असे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू होत असून, हे अधिवेशन मुंबईमध्ये होणार आहे. गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले होते. मात्र आता हे अधिवेशन मुंबईत होत असून, फडणवीस सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे. हे पावासाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात १२ दिवस कामकाज होणार आहे.

असे असेल पावसाळी अधिवेशन

या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी सादर केला जाणार आहे. यानंतर २१ आणि २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ आणि २० जून रोजी होईल. दरम्यान, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशासह राज्यात देखील युतीचा बोलबाला पहायला मिळाला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीला ४१ जागा मिळाल्याने फडणवीस सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे तर विरोधक पुरते कोमात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधक नुकत्याच झालेल्या पराभवामुळे पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कसे तोंड देणार हे देखील पहाणं तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

अधिवेशनाआधी होणार मंत्रिमंडळ विस्तार

सगळ्यात मह्त्त्वाची बाब म्हणजे हे अधिवेशन सुरु होण्याआधी म्हणजेच ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार देखील होण्याची शक्यता असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यामांशी बोलताना तसे संकेत दिले. दरम्यान या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा फडणवीस सरकारचा विचार असून, राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कृषीमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट हे देखील दिल्लीत जात असल्याने त्यांचे खाते देखील कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -