घरमहाराष्ट्रशरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात तक्रार

शरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात तक्रार

Subscribe

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मुंबईतील पराभूत उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली असली तरी संबंधित व्यक्तीचे फेसबुक अकाउंट मात्र अद्यापही सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

याप्रकरणी बारामतीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या प्रकरणी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीयाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया बारामती तालुका पैगंबर शेख,उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया संदीप मालुसरे, सुरज सावंत, वैभव पवार, दत्ता तांबे, सूर्यकांत पिसाळ, दीपक टेकाळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -