घरमुंबईआयआयटी मुंबईमध्ये 26 डिसेंबारपासून मूड इंडिगो

आयआयटी मुंबईमध्ये 26 डिसेंबारपासून मूड इंडिगो

Subscribe

आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल समजल्या जाणार्‍या आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ची रंगतदार सुरुवात 26 डिसेंबरपासून होत आहे. 26 ते 29 डिसेंबर असे चार दिवस चार रात्र चालणार्‍या मूड इंडिगोमध्ये 230 पेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. यामध्ये देशी,विदेशी कलाकारांचे कॉन्सर्ट, चर्चासत्र व विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत.

आयआयटी मुंबईमध्ये होणार्‍या 49 व्या मूड इंडिगोमध्ये देशातील 1700 कॉलेजमधील 1 लाख 43 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणार्‍या मूड इंडिगोमध्ये भारतीय कलाकार असलेले अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय, प्रितम, आशा भोसले, विशाल शेखर, सलिम सुलेमान, सोनू निगम, कैलाश खेर यांचे कॉन्सर्ट होणार आहे. तर परदेशातील द हकेन, पोर्कुपाईन ट्री, सिम्पल प्लॅन आणि डीजे विनाई यांचे कॉन्सर्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशीबरोबरच विदेशी संगीतकारांच्या गाण्यांचा अनुभवता घेता येणार आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे लिटफेस्टमध्ये पी. चिदंबरम, नारायण मूर्थी, अर्णब गोस्वामी, देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, आमिर खान, नसरुद्दीन शहा, मनोज वाजपेयी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी रॉक बॅण्ड स्पर्धा,डान्स स्पर्धा, फेस पेेंटिंग स्पर्धा, टाकाऊपासून उत्कृष्ट वस्त्रे बनवण्याची ट्रॅशन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, देसी बिट्स, जस्ट अ मिनिट्स, संस्कृती अशा विविध स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात येणार आहे.

1971 मध्ये सुरुवात झाल्यापासून मूड इंडिगोमध्ये विविध जागतिक विक्रम करण्यात आले आहेत. कॉलेज कार्यक्रममध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी झाल्याचा विक्रम 2011 मध्ये करण्यात आला. तर 2013 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी ओरियो बिस्किट चहामध्ये बुडवून खाल्ले होते. 2016 मध्ये जगातील सर्वात मोठे जमीनीवरील थ्रीडी चित्र काढण्यात आले होते. तर 2016 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगातील सर्वात मोठे कॅसेटच्या माध्यमातून पोट्रेट बनवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -