घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेसाठीही महाविकास आघाडी पॅटर्न

मुंबई महापालिकेसाठीही महाविकास आघाडी पॅटर्न

Subscribe

काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरातांचे संकेत

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी देखील हाच फॉर्म्यूला निश्चित होणार आहे. तशा स्वरुपाचे संकेत दस्तुरखुद्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी नागपूरात दिले. दरम्यान, २०२२ मध्ये होणार्‍या मुंबई महापालिकांच्या निवडणुकीसाठी देखील हाच फार्मुला अवलंबला जाण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची विशेष बैठक गुरुवारी नागपूरात पार पडली. या बैठकीच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील सतेवाच त्यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकाअर्जुन खरर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ज्यात प्रामुख्याने येत्या काळात होणार्‍या स्थानिक स्वराजच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी रणनिती ठरणार आहे.

- Advertisement -

आमचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर उभे राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच मुद्द्यांवर आगामी निवडणुका लढवायच्या का ? या निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत लढयाच्या का याबाबत ही निर्णय घेतला जाणार आहे. तर या निवडणुकीत विजय महाविकास आघाडीचा होईल, असाा विश्वास देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर मुंबई महापालिका बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता याबद्दल त्यांनी सकारात्मक पवित्रा घेतला असून याबाबत ही चर्चा केली जाणार आहे. तर येत्या काळात पाच वर्षे हे सरकार टिकणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आपण लक्ष देत नाहीत, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनानंतर
या बैठकीत मंत्री मंडळ विस्ताराबाबतही देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशनाच्या दोन दिवसानंतर हे विस्तार केली जाण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -