घरमुंबईमोटरमनने वाचविले जखमी प्रवाशाचे प्राण; लोकल थांबवून केली वैद्यकीय मदत

मोटरमनने वाचविले जखमी प्रवाशाचे प्राण; लोकल थांबवून केली वैद्यकीय मदत

Subscribe

एका मध्य रेल्वेच्या मोटरमनने लोकल थांबवून जखमी प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या एका तरुणाला मध्य रेल्वेच्या मोटरमनने लोकल थांबवून मदत केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी २ नोव्हेंबरची ही घटना असून मोटरमनने लोकल थांबवत प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. कर्तव्याच्या पुढे जाऊन प्रवाशाला मदत करणार्‍या मोटरमनला मध्य रेल्वेकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ दिशेच्या जलद मार्गावर मोटरमन प्रवीणकुमार कटियार अंबरनाथ – दादर लोकल चालवत होते. सकाळी ९. ४० वाजण्याच्या सुमारास एक तरुण जखमी अवस्थेत अंबरनाथ ते उल्हासनगर स्थानका दरम्यान, पडला असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. त्या तरुणाची हालचाल सुरु असल्याचे लक्षात येताच कटियार यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि लोकल थांबवली. त्याचवेळी गार्ड यांनी इतर सह प्रवाशांच्या मदतीने त्या तरुणाला शेजारीच असलेल्या लोकलच्या डब्यात ठेवले. तोपर्यंत या घटनेची माहिती मोटरमनने उल्हासनगर स्टेशन मास्तरांना दिली. लोकल उल्हासनगर स्थानकामध्ये येताच लोकलमधून त्या तरुणाला खाली उतरविण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करुन त्याला पुढील उपचाराकरिता उल्हासनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंकज रॉय (२१), असे या प्रवाशाचे नाव आहे.

- Advertisement -

मी मोटरमन म्हणून गेली ७ वर्षे काम करीत आहेत. आपण त्या तरुणाचे प्राण वाचवू शकलो यात खूप मोठे समाधान आहे. तसेच प्रवाशांनी स्वता:चा जीव धोक्यात घालून प्रवास करु नये.  – प्रवीणकुमार कटियार; मोटरमन

मोटरमन प्रविणकुमार कटियार यांनी तातडीने एका जखमी प्रवाशाचा जीव वाचवला आहे. या त्यांच्या कार्याबदल त्याना योग्य पुरस्कार देण्यात येणार आहे.  – शिवाजी सुतार; मध्य रेल्वेचे मुख्य जनसंर्पक अधिकारी

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकले, लवकरच शपथ विधी?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -