घरमुंबईमुंबईसह राज्यभरात 'मौखिक कर्करोग जागरूकता महिना' मोहीम

मुंबईसह राज्यभरात ‘मौखिक कर्करोग जागरूकता महिना’ मोहीम

Subscribe

४ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर, इंडियन डेंटल असोसिएशन’ तर्फे मुंबई आणि नवी मुंबई येथे ‘राष्ट्रीय मौखिक कर्करोग जागरुकता महिना’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून युवकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाणार आहे.

कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं आहे हे सर्वश्रूत आहे. त्यातही तोंडाच्या कॅन्सरमुळे सर्वात जास्त मृत्यू होतात. हे प्रमाण कमी व्हावं यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ४ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर, इंडियन डेंटल असोसिएशन’ तर्फे मुंबई आणि नवी मुंबई येथे ३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ‘राष्ट्रीय मौखिक कर्करोग जागरुकता महिना’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून युवकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाणार आहे. या मोहिमेचं उद्घाटन ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रम’च्या राज्य प्रभारी अधिकारी डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.

२०२५ पर्यंत २५ टक्के एवढं प्रमाण करणार

याविषयी डॉ. साधना तायडे म्हणाल्या की ‘ एखाद्या रुग्णाला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले की, त्यांच्यावर सरकरी हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचार सुरू आहेत. तंबाखू सेवनाचे प्रमाण राज्यात ६ ते ७ टक्क्यांनी घटले आहे. ते आता १० टक्क्यांवर न्यायचे आहे. २०२५ पर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण २५ टक्के एवढे खाली आणायचे आहे. हे काम एकट्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाही. त्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल. शिवाय, तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. पण, मोठ्या प्रमाणात जर जनजागृती करायची असल्यास तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातही राबवणार मोहिम

राष्ट्रीय मौखिक कर्करोग जागरूकता महिना उर्वरित महाराष्ट्रात २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे. देशाच्या ग्रामीण भागात तंबाखू सेवनाचे प्रमाण खूप मोठे आहे. खासगी डॉक्टर आणि सरकारी अधिकारी यांनीही यात सहभागी होणे गरजेचे आहे. याविषयी सर्व सरकारी, पोलीस खाते, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रे पाठवण्यात आली आहेत की तुमच्या कार्यालयाला तंबाखू मुक्त करा. असेही डॉ.तायडे यांनी स्पष्ट केलं आहे.
मौखिक आरोग्यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारद्वारे ३४ जिल्ह्यांमध्ये मौखिक आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात आलं आहे. या मोहिमेद्वारे दोन कोटी ६० लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४५० जणांना तोंडाचा कर्करोग असल्याचं निदान झालं असून या रुग्णांवर सरकारद्वारे मोफत उपचार सुरू आहेत.

– डॉ. साधना तायडे, सह-संचालिका (असंसर्गजन्य रोग) आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र

- Advertisement -

पथनाट्यातून करणार जनजागृती

या मोहिमेअंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई येथे १२ ठिकाणी विविध महाविद्यालयांमधील १०० विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पथनाटयांचे आयोजन कण्यात येणार आहे. एमजीएम डेंटल महाविद्यालय आणि कीर्ती महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी दोनवेळा पथनाट्ये सादर करणार आहेत.

दहापैकी एक तंबाखूच्या कर्करोगामुळे मृत्यू

देशात आज मौखिक कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आपल्या देशात तंबाखूचे सेवन गुटखा, बिडी, सिगारेट या माध्यमातून केले जाते. मौखिक कर्करोग इतर प्रकारच्या कर्करोगांच्या तुलनेत पहिल्या तीनमध्ये मोडतो. भारतातील दहापैकी एक व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्यू पावते.

याविषयी अधिक माहिती देताना इंडियन डेंटल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी सांगितलं की, तंबाखूमुळे १.५ लाख कर्करोग, ४.२ दशलक्ष हृदयरोग आणि ३.७ दशलक्ष फुफ्फुसरोग दरवर्षी आढळून येतात. १४ कोटी पुरुष आणि ४ कोटी महिला भारतात तंबाखूसेवन करतात. भारतातील १५ ते ४९ वयोगटातील ५७ टक्के लोकसंख्या ही तंबाखूसेवन करते. याच वयोगटातील महिलांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण एक दशांश एवढे आहे. दरवर्षी पाच हजार युवक नव्याने तंबाखू सेवनाकडे वळतात.

२०२० पर्यंत १३ टक्के मृत्यू हे तंबाखूमुळे होण्याची शक्यता आहे. ३८.४ दशलक्ष विडी धूम्रपान करणारे लोक आणि १३.२ दशलक्ष सिगारेट धुम्रपान करणारे लोक हे अकाली मृत्युमुखी पडतील. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे, असेही डॉ. ढोबळे म्हणाले.


वाचा – बोगस डॉक्टर: आरोग्य सेवा पोखरणारा कर्करोग

वाचा – तंबाखू खाताय? २ लाख ६२ हजार लोकांना कर्करोगाची भीती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -