घरमुंबईठेविदारांचे रिझर्व्ह बँकेवर धरणे लवकरच आंदोलन!

ठेविदारांचे रिझर्व्ह बँकेवर धरणे लवकरच आंदोलन!

Subscribe

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण!

खारघर येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत, यासाठी 3 जानेवारी 2020 रोजी माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या नेतृत्वाखाली बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह समितीमधील पदाधिकारी, ठेवीदार या धरणे आंदोलनात सहभागी असणार आहेत.

ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रशासन असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रीयपणे कार्यरत आहेत. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली होती. मात्र बॅँकेतील रकमा अडकलेल्या आहेत. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन 840 ठेवीदारांचे तक्रारी अर्ज सादर केले. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याचे निर्देश कर्नाळा बँकेला देण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी हे धरणे आंदोलन होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -