घरमुंबईमुंबईच्या गल्लीबोळाची सैर चालता बोलता

मुंबईच्या गल्लीबोळाची सैर चालता बोलता

Subscribe

खाऊगल्ल्या ते ट्रेकिंग पॉईंटचे नकाशे तयार

मुंबईतील खाऊ गल्ल्यांपासून ते ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तुंची सफर आता आणखी मजेशीर होणार आहे. हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीने मुंबई महानगर क्षेत्रातील मालमत्ता आणि नैसर्गिक स्थळांच्या दस्तावेजीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई परिसरात फेरफटका मारताना प्रवासात सहज सोबत बाळगता येणारे असे नकाशे तयार करण्यात आले आहेत. फोर्ट, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे असे बृन्मुंबईशी संबंधित चार आणि ठाणे, कल्याण, वसई – विरार, माथेरान आणि पेण – अलिबाग असे हे पाच नकाशे तयार करण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाच्या वारसाहक्क मालमत्ता आणि नैसर्गिक स्थळांचे दस्तावेजीकरण करून ते लोकांना संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहेत.

अनेक स्थळे यापूर्वी अज्ञात आणि उपेक्षित अवस्थेत होती. या नकाशांमध्ये दर्शवलेली वारसाहक्क स्थळे उत्तम संशोधनाअंती सिद्ध झालेली आहेत. या ठिकाणांना पायी तसेच सायकल प्रवासाने भेट देता येईल अशी ही ठिकाणे आहेत. त्यामध्ये वारसास्थळे, विविध बाजारक्षेत्रे, खाऊ गल्ल्या ते माथेरान – सह्याद्री क्षेत्रातील ट्रेकिंगसाठीच्या विविध स्थळांची माहिती मिळणार आहे. नकाशांसोबतच भविष्यांमध्ये माहिती पुस्तिकाही हेरिटेज सोसायटीमध्ये काढण्याचा मानस असल्याचे एमएमआरडीए प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितले. वारसाप्राप्त नकाशांची मालिका नुकत्याच झालेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. देशाअंतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना या मुंबई तसेच महानगर क्षेत्रातीव स्थळांची माहिती या निमित्ताने मिळेल. मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाच्या वारसाहक्क मालमत्ता आणि नैसर्गिक स्थळांचे दस्तावेजीकरण करून ते लोकांना उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच पुढाकार हाती घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -