घरमुंबईखिडकीतून गेला प्रेयसीला भेटायला आणि मृत्यू ओढावला

खिडकीतून गेला प्रेयसीला भेटायला आणि मृत्यू ओढावला

Subscribe

प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नवव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथे प्रेमामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नेमके काय घडले?

मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडयामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास विवाहित प्रेयसीच्या फ्लॅटमध्ये खिडकीवाटे घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका १९ वर्षीय तरुणाचा पाय घसरुन मृत्यू झाला आहे. हा युवक विवाहितेच्या प्रेमात पडला होता. हे दोघेही एकाच इमारतीत राहत होते. हा तरुण मूळचा बिहारचा असून तो दोन वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत नायर रुग्णालयाजवळ असलेल्या एका १५ मजली इमारतीमध्ये तो आपल्या काकांकडे राहत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. अलीकडेच या तरुणाला त्याच्या काकांनी त्या विवाहितेच्या घरातून बाहेर पडताना पाहिले होते. त्यामुळे हा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी खिडकीतून तरुणीच्या घरात जायचा. भिंतीला लागून असणाऱ्या कठज्यावाटे तो खिडकीतून प्रवेश करायचा. याआधी देखील त्यांनी खिडकीतून विवाहित प्रेयसीच्या घरात प्रवेश केला होता. असाच प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, त्यांनी डोकावून पाहिले असता घरामध्ये विवाहितेचा पती घरामध्ये होता. त्यामुळे त्याने माघारी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भिंतीची कडा निसरडी झाली होती. त्या कडेवरुन त्याचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मी काहीतरी खाली कोसळल्याचा आवाज ऐकला पण नवरा घरी असल्यामुळे बाहेर काय घडले ते पाहिले नाही, असे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.


हेही वाचा – प्रेमासाठी मुलीने केली आईची हत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -