घरमुंबईMumbai Cleanup Marshals: सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकाल, कचरा फेकाल, तर...; मुंबईत पुन्हा...

Mumbai Cleanup Marshals: सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकाल, कचरा फेकाल, तर…; मुंबईत पुन्हा क्लीन अप मार्शल तैनात

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली आहे. पान, गुटखा खाऊन जागोजागी थुंकणाऱ्या, तसंच, कुठेही कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या आता मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली आहे. पान, गुटखा खाऊन जागोजागी थुंकणाऱ्या, तसंच, कुठेही कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या आता मुसक्या आवळल्या जाणार आहेत. कचरा टाकताना किंवा थुंकताना कोणी दिसलं तर क्लीन अप मार्शल्स संबंधित व्यक्तीकडून दंड आकारणार आहेत. हा दंड फोन पे, गुगल पे च्या माध्यमांतून किंवा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने दंड वसूल करण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईत 720 क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. (Mumbai Cleanup Marshals Beware If you spit throw garbage then you will be punished Clean up marshal deployed again in Mumbai)

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल नेमण्याचे ठरवले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत स्वच्छता दूत नेमण्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने केली होती. दंडात्मक कारवाई न करता केवळ प्रबोधनाच्या हेतूने स्वच्छता दूत नेमण्यात येणार होते. मात्र हा उपक्रम बारगळ्यानंतर आता पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल नेमण्याचे महानगरपालिका प्रशासनाने ठरवले आहे. प्रत्येक विभागात 30 ते 35 क्लीन अप मार्शल याप्रमाणे संपूर्ण मुंबईत 720 मार्शल नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संपल्यानंतर मार्शलची सेवा बंद करण्यात आली होती. महानगरपालिकेने त्यांचे कंत्राट खंडीत केले होते.

- Advertisement -

क्लीन अप मार्शल आणि वाद

क्लीन अप मार्शल आणि वाद यांचं जुनं नात आहे. मार्च 2020 पासून मुंबईत कोरोनाचे संकट सुरू झाले होते. त्यानंतर 20 एप्रिल 2020 पासून मुंबईत मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं. मास्क नसलेल्यांवर कारवाई करताना क्लीन अप मार्शल अनेकदा वादात सापडले होते. अनेक वेळा मार्शलवर लोकांकडून पैसे उकळणे, मारहाण करणे आणि जादा शुल्क आकारणे असे आरोप करण्यात आले होते. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विनाकारण लोकांवर कारवाई न करण्याचे आदेश क्लीन अप मार्शनला दिले होते्. तसंच क्लीन अप मार्शलच्या विरोधात तक्रारी येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 20 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत मास्क नसलेल्यांवर क्लीप अप मार्शलकडून कारवाई केली जात होती. मास्क नसलेल्यांना 200 रुपये दंड ठोठावण्यात येत होता. मात्र आता हा वाद टाळण्यासाठई दंड घेण्याची प्रक्रिया ऑनलाईनल केली जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -