घरक्राइमMumbai Crime News : धक्कादायक ! मृतदेहासोबत कुटुंबाने हॉटेलमध्येच घालवले 10 दिवस

Mumbai Crime News : धक्कादायक ! मृतदेहासोबत कुटुंबाने हॉटेलमध्येच घालवले 10 दिवस

Subscribe

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबातील चौघांनी मृतदेहासोबत तब्बल दहा दिवस काढले. मृत महिलेच्या मुलाने शनिवारी रात्री या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

हेही वाचा – CM Eknath Shinde : अधिसूचनेवरील हरकतींची छाननी सुरू; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली सभागृहात माहिती

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीमा युसूफ हलाई (४८) यांचा मृत्यू झाला. नसीमा यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पुतण्याने नसीमाचा मुलगा यासीन याला मेल पाठवून दिली होती. मृत्यूपूर्वी नसीम यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमटे म्हणाले की, मृत नसीमा यांचा मुलगा युकेहून आल्यानंतर आम्हाला या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर आमच्या टीमने हॉटेलमध्ये जात तो मृतदेह बाहेर काढला. बराच काळ लोटल्याने हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मृत्यूचे नेमके कारण तसेच या कुजलेल्या मृतदेहासोबत १० दिवस काढणाऱ्या कुटुंबाचे कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. साकीनाका येथील हॉटेलमध्ये मृतदेहासोबत नसीमाचे वडील अब्दुल करीम सुलेमान हलाई (८२), नसीमा यांची २६ वर्षांची मुलगी, अब्दुल यांचा मुलगा आणि नातू हे सदस्य १० दिवस रहात होते. विशेष म्हणजे, हॉटेलच्या रुममध्ये १० दिवस मृतदेह होता, पण ते कुटुंबाने कुणालाही कळू दिलं नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना आली नाही. कुटुंबातील सदस्य रुमचा दरवाजा बंद ठेवायचे. मात्र, एवढे दिवस हा मृतदेह तिथे होता, त्याचा दुर्गंध कसा लपवला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Reservation: मुसलमान समाजाला 5 टक्के आरक्षण द्या; अबू आझमी, रईस शेख यांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी दोघीही जोगेश्वरी येथे रहायच्या. नसीमाचं तिच्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर २१ महिन्यांपूर्वी त्यांनी घर सोडलं होतं. तेव्हापासून कुटुंबातील पाच जण वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रहायचे. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -