घरमुंबईमुंबई- गोवा हायवेवर २३ ते २५ दरम्यान अवजड वाहनांना बंदी

मुंबई- गोवा हायवेवर २३ ते २५ दरम्यान अवजड वाहनांना बंदी

Subscribe

मुंबई- गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता २३ ते २५ डिसेंबरपर्यंत या हायवेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई – गोवा हायवेवर येत्या २३ ते २५ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून सर्व सरकारी कर्माचारी आणि इन्टरनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी लागणार आहे. त्यामुळे ख्रिस्मस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण मुंबईबाहेर जात असतात. जास्तकरुन गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी खूप असते त्यामुळे गोव्याकडे जाणारा मुंबई – गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसंच मुंबई- गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता २३ ते २५ डिसेंबरपर्यंत या हायवेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

ख्रिस्मसची सुट्टी लागली की, मुंबई – गोवा हायवेवर आणि मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होते. यावेळी मुंबई- गोवा हायवेवर चौपदरीकरणाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे या हायवेवर अधिकच वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे काही पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई-बंगळुरू या पर्यायी हायवेचा वापरही करता येऊ शकतो. गगनबावडा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट मार्गे कोकणात जाता येऊ शकते. तसेच बेळगावमार्गेही गोव्याला जाता येते. यामुळे वाहनांची गर्दी टाळायची असल्यास वरील मार्गांचा वापर करावा. चिपळून, रत्नागिरीला फिरायला जायचे असल्यास खालापूर टोलनाक्यावरून इमॅजिका थिम पार्कच्या रोडने पुढे थेट पालीला बाहेर पडता येते. या सर्व पर्यायी मार्गाचा वापर करता येऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – 

मुंबई-गोवा हायवेचे केवळ २० किलोमीटरचे चौपदरीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -