घरताज्या घडामोडीअडीच महिन्यानंतर मुंबईत धावली पहिली लोकल

अडीच महिन्यानंतर मुंबईत धावली पहिली लोकल

Subscribe

आज पहाटे पावणे सहा वाजता चर्चगेटहून पहिली लोकल विरारला रवाना झाली.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन अडीच महिने बंद होती. पण आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार नाही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चर्चगेटहून पहिली लोकल पहाटे ०५.४९ वाजता विरारला रवाना झाली. या पहाटेच्या लोकलमध्ये एकही सामान्य प्रवासी नव्हता. या लोकल महत्त्वाच्या स्थानकावर थांबवणार आहे.

बीएमसी कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलिस यांनाच स्थानकात प्रवेश मिळणार आहे. आयडी कार्ड दाखवल्यावरच रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार असून एका लोकलमध्ये फक्त ७०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

- Advertisement -

पहाटे ०५.३० ते रात्री ११.३० दरम्यान ही लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. दर १५ मिनिटांनी लोकल धावणार आहे. यामध्ये सर्वसामन्यांना प्रवास करता येणार नाही.

‘पाईंट टु पाईंट’ लोकल चालविण्यात येणार 

अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेकडून कोणतेही तिकीट देण्यात येणार नाही. लोकल चालविण्यासाठी राज्य सरकार अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांची यादी रेल्वेला देणार आहे. त्याआधारे तिकीट काढून रेल्वे प्रशासन राज्य सरकारला देईल. या तिकीटांचे पैसे राज्य सरकार रेल्वेला आगाऊ देणार आहे. राज्य सरकार अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना ‘क्यु आर कोड’ आयकार्ड देणार आहे. या लोकल फक्त जलदगती मार्गावर धावणार आहे. तसेच त्या ‘पाईंट टु पाईंट’ चालविण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक आणि लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार ऑफीसचा वेळ ठरवेल. कर्मचार्‍यांचे तिकीट,थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोनो, मेट्रोसाठी नवीन तिकिट प्रणाली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -