घरमुंबईपालघरसाठी ५ तर ठाण्यासाठी २ दिवसाचा हायअलर्ट - हवामान विभाग

पालघरसाठी ५ तर ठाण्यासाठी २ दिवसाचा हायअलर्ट – हवामान विभाग

Subscribe

कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे पुढील पाच दिवस पालघर आणि दोन दिवस ठाणे जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अद्यापही कमी झालेला नाही. सोमवार पहाटेपासूनच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पाच दिवस पालघर आणि दोन दिवस ठाणे जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज, १ जुलै रोजी जारी केलेल्या पत्रकात कुलाबा वेधशाळेने या दोन जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे सतर्कतेचा इशारा

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, १ ते ५ जुलै दरम्यान, पालघर जिल्ह्यात तर १ आणि २ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ५ जुलैपर्यंतच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरूच राहणार आहे. मुंबईतही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून शहर आणि उपनगरातही संततधार बरसत होती. दुपारी थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मालाड पश्चिम भागात सर्वाधिक १०४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

सखल भागात पाणी साचले 

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईच्या सखल भागातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच ठाणे, कल्याण, डोबिंवली, अंबरनाथ तसेच सायन, विक्रोळी यासह सायन, किंग्जसर्कल, माटुंगा, कुर्ला, खार सबवे या मुंबईच्या सखलभागात पाणी तुंबले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नवी मुंबईतील वाशी, पनवेल, खारघर भागात चांगलाच पाऊस पडतो आहे. या ठिकाणही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -