घरमुंबईVideo: मुंबई मेट्रोने सादर केलं आगामी 'CST' स्थानकाचं 'चित्तथरारक' हवाई दृश्य

Video: मुंबई मेट्रोने सादर केलं आगामी ‘CST’ स्थानकाचं ‘चित्तथरारक’ हवाई दृश्य

Subscribe

या 'चित्तथरारक' १.२५ मिनिटांच्या हवाई व्हिडिओला ९ हजारांहून अधिक व्ह्यूज्

आरे कॉलनीतील २ हजाराहून अधिक झाडांची कत्तल केल्यानंतर काही दिवसांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आगामी सीएसटी मेट्रो स्थानकाचा हवाई ‘चित्तथरारक’ व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे. या ‘चित्तथरारक’ १.२५ मिनिटांच्या हवाई व्हिडिओला ९ हजारांहून अधिक व्ह्यूज् मिळाले आहेत. २५० मीटर लांबीच्या मेट्रो स्थानकात एमसीजीएम मुख्यालय, सीएसएमटी मध्य रेल्वे स्टेशन, प्रेस क्लब, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, मेट्रो सिनेमा अशा प्रमुख ठिकाणांना जोडणारे सहा मार्ग प्रवेशासाठी असून तसेच एक्झिट पॉईंट असणार आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडसाठी सर्व झाडे तोडण्यात आले होते. यानंतर ​​एमएमआरसीकडून सुप्रीम कोर्टाचे पालन करून प्रकल्पांसाठी यापुढे कोणत्याही झाडे तोडण्यात येणार नाही, असे देखील सांगण्यात आले. कॉर्पोरेशन ३३.५ किमी लांबीच्या कुलाबा-सीप्झ मेट्रो ३ ची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी यापुर्वीच आरेतील २ हजार १४१ झाडे तोडण्यात आले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या घटनेला विरोध दर्शविला होता, त्यादरम्यान पोलिसांनी २९ लोकांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ही वसाहत १३ हजार हेक्टर क्षेत्रावर वसलेली आहे. या भागात २७ पेक्षा अधिक आदिवासी गावे असून विविध प्राण्यांच्या जाती देखील आहेत.


आयोध्या प्रकरण: सुनावणी अंतिम टप्प्यात; निकालापुर्वीच कलम १४४ लागू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -